आता नाशिककरांना मिळणार सुईविना कोरोना व्हॅक्सिन

एकही लस न घेतलेल्या व्यक्तींना दिली जाणार व्हॅक्सिन

0

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यामध्ये केंद्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार covid-19 लसीकरण अधिक सुलभतेने होणे कामी तसेच शंभर टक्के लसीकरण यशस्वी होणे कामी इंडिया फर्स्ट नीडल फ्री व्हॅक्सिन भारतात पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत त्याची पूर्वतयारी म्हणून  जिल्हाधिकारी  सुरज मांढरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे मार्गदर्शनानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयामार्फत जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य सेविकांचे इन्स्ट्रुमेंट हाताळणीचे एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये covid-19 प्रतिबंधात्मक झायडस कंपनीची लस आता शासनामार्फत दिली जाणार आहे यासाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात covid-19 लसीकरणाचे काम करणाऱ्या आरोग्य सेविका यांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर घेण्यात आले यामध्ये झायडस कंपनीचे फार्माजेट हे इन्स्ट्रुमेंट तयार केले असून या इंस्ट्रूमेंट द्वारे लस दिली जाणार आहे हे नीडल फ्री वॅक्सिंग असून आत्तापर्यंत एकही लस न घेतलेल्या व्यक्तींना ती दिली जाणार आहे.

त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेविकांचे फार्मा जेट इन्स्ट्रुमेंट हाताळण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले हे प्रशिक्षण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर,जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी डॉ प्रकाश नांदापूरकर, , जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ कैलास भोये यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाले यामध्ये प्रत्यक्ष हे इन्स्ट्रुमेंट हाताळणी करण्यात आली त्याला कशा पद्धतीने लस द्यायची याची सर्व आरोग्यसेविका प्रॅक्टिस करून घेण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ हिमानी चांदेकर, श्री वदक श्री उगले यांनी परिश्रम घेतले

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!