पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा नवा उच्चांक : सलग पाच दिवस दरवाढ

0

मुंबई देशातले पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत.सलग पाचव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैसे वाढ केली. पाच दिवसात पेट्रोल आणि डिझेल १.७५ रुपयांनी महागले आहे. एक लीटर पेट्रोलही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११५.१५ रुपये झाला आहे.तर डिझेलचा भाव १०६.२३ रुपये प्रती लीटर इतका वाढला आहे.नाशिकमध्ये एक लीटर पेट्रोल साठी ग्राहकांना आता ११५.५३ रुपये तर डिझेल साठी १०४.९६ रुपये मोजावे लागणार आहेत.

आजच्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल १०९.३४ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०६.०४ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०९.७९ रुपये इतके वाढले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११८.०७ रुपये असून बंगळुरात पेट्रोल ११३.१५ रुपये झाले आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ८४.३८ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावला. त्यात ०.०६ डॉलरची वाढ झाली. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.७६ टक्क्याच्या वाढीसह ८३.५७ डॉलर प्रती बॅरल इतका झाला.उत्पादन कमी असल्याने कच्च्या तेलाचा भाव ८५ डॉलर पुढे गेला आहे. २०१४ नंतर तेलाचा हा सर्वाधिक दर आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.