Nashik- साहित्य संमेलना साठी बांधकाम व्यवसायिक दिपक चंदे यांची २५ लाखाची मदत 

0

नाशिक – (प्रतिनिधी)  नाशिकमध्ये ९४  व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ३ ते ५ डिसेंबर रोजी भुजबळ नॉलेज सिटी येथे करण्यात आले आहे. हे संमेलन एका संस्थेचे नसून तर ते संपूर्ण नाशिककरांचेच आहे या भावनेने अनेक नाशिककर हे संमेलन यशस्वी होण्यासाठी तन मन धना ने  हातभार लावीत आहेत. त्यातीलच एक असलेले प्रथितयश बांधकाम व्यवसायिक दिपक कल्याणजी चांदे यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. त्यांनीही या साहित्यपरंपरेत आपलेही योगदान असावे यासाठी तब्बल २५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

नाशिकला धार्मिक परंपराच नाही तर सांस्कृतिक परंपरा देखील तितकीच महत्वाची आहे. कवी कुसुमाग्रजांपासून ते प्राजक्त देशमुखांपर्यंत अनेकांनी साहित्याच्या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाशिक मध्ये अनेक बांधकाम व्यवसायिक आहेत परंतु दीपक चांदे यांनी पुढाकार घेऊन हि मदत जाहीर केली हि मदत महत्वाची ठरणार आहे.

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना.छगनरावजी भुजबळसाहेब, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर निधी संकलन समिती प्रमुख रामेश्वर कंलत्री सदस्य नंदकुमार सूर्यवंशी, सुभाष पाटिल शंकर बोर्हाड़े संजय करंजकर. यांच्याकडे त्यांनी  रविवारी (३१ऑक्टो ) रोजी ५ लक्ष रकमेचा धानादेश सुपूर्द केला. ते यावेळी म्हणाले की, हा नाशिकच्या साहित्य परंपरेला माझा सलाम आहे. या शहराची जडघडण होत असताना ती केवळ भौगोलिक होऊ नये तर ती सांस्कृतिक दृष्ट्या देखील व्हावी यासाठी मी ही मदत करतो आहे. यापुढेही  काही मदत लागल्यास मी तत्पर असेन असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी २ व ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आर्थिक भार उचलला आहे. तसेच त्याच्या हॉटेलमधील रुम्स हे आलेल्या पाहुण्यांसाठी विनामुल्य देणार आहेत. त्याच बरोबर शहरात ज्या ज्या ठिकाणी कमानी उभारल्या जातील त्याचा अर्थिक भार देखील ते उचलणार असल्याचे त्यांनी कबुल केले आहे. याच बरोबर त्यांच्या फर्म मध्ये असलेली काही  वाहने ही संमेलनाच्या काळात प्रमुख पाहुण्यांसाठी देण्याची इच्छा  व्यक़्त केले आहे.

नाशिककरांना मिळणार साहित्याची मेजवानी – दिपक कल्याणजी चंदे

नाशिकची जमीन ही सुपिक उपजाऊ आहे हे कृषी उत्पादनांनी जगभर सिद्ध केलेच आहे. पण या मातीत कला,संस्कृतीचा वारसाही जोपासला जातो. नाशिकच्या अनेक नामवंत कलाकारांनी, साहित्यिकांनी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मुळात नाशिककर कलाप्रेमी, साहित्यप्रेमी रसिकवृत्तीचे आहेत. हे मागच्या साहित्य संमेलनाला नाशिककरांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादातून लक्षात आले.

Deepak Chande
दिपक कल्याणजी चंदे

लक्ष्मी आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या नाशिक नगरीला यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद लाभले आहे ही तमाम नाशिककरांच्या दृष्टीने अभिमानाची व गौरवाची बाब आहे. कोरोनामुळे पुढे ढकलावेलागलेले साहित्य संमेलन आता ३ ते ५ डिसेंबर रोजी भुजबळनॉलेज सीटी येथे संपन्न होत आहे. याला रसिक नाशिककरभरभरून प्रतिसाद देतील आणि साहित्यिक फराळ व मेजवानीचाआनंद लुटतील याची खात्री आहे. या साहित्य संमेलनासाठीआयोजकांनी गेले वर्षभर अत्यंत कठोर परिश्रम घेतले. मा.पालकमंत्री भुजबळ साहेब, मा. जयंत जातेगांवकर आणि आयोजन कमिटीतील सर्व सदस्यांचे तमाम नाशिकरांच्यावतीने मनःपूर्वकआभार. प्रायोजकत्वाच्या नात्याने आम्हालाही खारीचा वाटा उचलण्याची व साहित्य दिंडीतील सेवेकरी होण्याची संधी दिलीतयाबद्दल आयोजन कमिटीचे व्यक्तीशः आभार मानतो.

– दिपक कल्याणजी चंदे,

दिपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, नाशिकरोड

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.