ॲड.जयंत जायभावे यांच्या पुस्तकाचे सर्वेच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांच्या हस्ते प्रकाशन 

0

नाशिक,दि,६ सप्टेंबर २०२४ – ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत दत्तात्रय जायभावे यांच्या संविधानावरील “We The People of India & The Spirit of Constriction” इंग्लीश पुस्तकाचा सर्वोच्च न्यायालयाचे  येथील  न्यायमूर्ती श्री. अभय ओक यांचे हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेने आयोजीत केलेली “राज्यस्तरीय वकील परिषद २०२४” पुणे येथे संपन्न झाली. या कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात  आले. त्या परिषदेस जवळपास ५००० वकीलवर्ग उपस्थित होते.

नाशिकचे प्रख्यात वकील व महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सभासद ॲड. जयंत दत्तात्रय जायभावे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुणे येथे संपन्न झाला. महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे चेअरमन मा. ॲड. श्री. राजेंद्र बी. उमाप व व्हाईस चेअरमन मा. ॲड. श्री. उदय पी. वारूंजीकर व भारतीय वकील परिषदेचे सभासद मा. ॲड. श्री. आशिष पी. देशमुख यांनी व इतर सर्व सभासद यांचे सहकार्याने ही परिषद आयोजीत केली होती.

या पुस्तकाचे संपादन ॲड. सौ. वसुधाताई कराड व अॅड. सौ. सुनिता अविनाश पांचाळ (निकम) यांनी केले. तसेच त्यांचा सहकारी वर्ग ॲड. हुजेफा सैय्यद व अॅड. योगेश टिळे यांनी आपले संगणकीय कुशलतेतुन तपशिल काढून देण्यास मोलाचे सहकार्य केले. शिवाय मा. श्री. रणजीत प्रधान सर यांचे या पुस्तकाच्या संपादनाला विशेष मोलाचे सहकार्य लाभले. तसेच अॅड. नम्रता विपुल मेहता यांचे देखील सहकार्य लाभले. नागपुरची १०० वर्षे पूर्ण झालेली कंपनी “ऑल इंडीया रिपोर्टर” (ए.आय.आर) हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.

भारताच्या संविधानाला ७५ वर्षे पुर्ण होत असतांना २०२४ हे वर्ष “भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव” महाराष्ट्र व गोवा वकील परिषद देशभर साजरा करीत आहेत. अशा वेळी देशभरातील सामान्य जनतेला संविधानाची ओळख व्हावी, संविधान म्हणजे नक्की काय, संविधानातील आपले हक्क अधिकार कर्तव्य काय? व समाजातील प्रत्येक घटकाला संविधानाप्रती जागृत करण्याचा हेतु साध्य होण्याच्या दृष्टीने अॅड. जयंत दत्तात्रय जायभावे यांनी संविधानावरील “भारतीय संविधानातील लोकमंत्र” हे पुस्तक लिहिले व ते पुस्तक मा.न्या. श्री. भुषण आर. गवई सो. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या  पुस्तकाची मागणी पाहता सामान्य जनतेसाठी त्या पुस्तकाचे अॅड. जयंत द. जायभावे यांनी इंग्रजीमध्ये अनुवादन करून “We The People of India & The Spirit of Constriction” हे पुस्तक साध्या, सरळ व सोप्या भाषेत लिहिले

या  पुस्तक प्रकाशन सोहळ्यास न्यायमुर्ती व वकील वर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सोहळ्यास मा.न्या. प्रसन्ना वराळे साो. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली हे उपस्थित होते. तसेच मा. न्या. श्री. देवेंद्र उपाध्याय साो. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई हे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र सरकारचे मा. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत साो.. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्या. श्री. नितीन जामदार साो, मा. न्या. श्री. के. आर. श्रीराम साो., मा. न्या. श्रीमती. रेवती मोहिते डेरे मॅडम, मा.न्या. श्री. नितीन सांबरे साो., मा. श्री. आरिफ डॉक्टर साो. तसेच अॅडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र मा. श्री. डॉ. बिरेंद्र सराफ साो. अॅडव्होकेट जनरल ऑफ गोवा मा. श्री. देविदास पंगम साो., बार कौन्सिल ऑफ इंडिया चे चेअरमन व राज्यसभेचे नुकतचे निवडून आलेले मा. श्री. मनन कुमार मिश्रा साो., व्हाईस चेअरमन श्री. एस. प्रभाकरन साो. व पी.डी.जे. पुणे मा. श्री. महेंद्र के. महाजन साो. हे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.