यावेळी अध्यक्ष राजेश सिंघल, सेक्रेटरी संगीता लोढा यांच्या सोबत डॉ. आवेश पलोड,ओंकार महाले,डॉ.अनिता भामरे,डॉ. प्रणिता गुजराथी,संजय खैरनार,मुकुंद साबू, डॉ. अमोल जगदाळे,रुपेश झटकारे,अमोल कलंत्री,दीप्ती जानोरकर, सुरेश चावला, डॉ. पंकज भट,किरण सागोरे, अनुज नावन्दर, सोनाली नेरकर, सुशांत जाधव, अमित आव्हाड, वैभव वाणी,अमित पगारे आदींनी कार्यभार स्वीकारला.
जिल्ह्याच्या भावना ठक्कर तसेच इतर क्लब चे पदाधिकारी आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. रमेश मेहेर यांनी रोटरी मध्ये काम करताना कोणती पंचसूत्री वापरावी याचे मार्गदर्शन केले तर आशा वेणूगोपाल यांनी रोटरी संस्कृती इतर क्लब संस्कृती पेक्षा कशी वेगळी आहे याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिता भामरे आणि डॉ प्रणिता गुजराथी यांनी केले. क्लब सेक्रेटरी डॉ.संगीता लोढा यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. आवेश पलोड,ओंकार महाले,किरण सागोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.