एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडी कडून अटक 

0
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडी कडून आज पहाटे अटक करण्यात आली आहे. पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी हि कारवाई करण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना काल सकाळी ईडी कार्यालयात बोलविण्यात आले आणि संध्याकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे हा एकनाथ खडसे यांना हा मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे. या जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांचीही चौकशी झाली होती. आपण याप्रकणात निर्दोष आहोत, असे स्पष्टीकरण खडसे यांनी या आधी दिले आहे.

खडसे महसूल मंत्री असताना हा व्यवहार झाल्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या पत्नी आणि जावयाने ही जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आले होते. जमीन व्यवहार या वादग्रस्त प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना २०१६ मध्ये त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.तर आतापर्यंत याच प्रकरणी चार वेळा त्यांना चौकशीला समोरे जावे लागले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.