आजचे राशिभविष्य गुरूवार,३० मे २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख कृष्ण सप्तमी/अष्टमी. ग्रीष्म ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज वर्ज्य दिवस आहे” *कालाष्टमी*
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा /शततारका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. चंद्राचा बळ आहे.मोजून मापून बोलावे. कलाकारांना संयम ठेवावा लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी जपून पावले टाकावीत. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. दानधर्म कराल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. विनाकारण खर्च वाढू शकतात, वाहन जपून चालवावे. मान अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रतिकूल दिवस आहे.रवी,गुरू,शुक्राची अपेक्षित मदत मिळणार नाही.सरकारी कामात दिरंगाई किंवा त्रास जाणवेल.भिन्न लिंगी व्यक्तीकडून त्रास होऊ शकतो.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नोकरी व्यवसायात संमिश्र अनुभव येतील. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल. पत्नीशी मतभेद संभवतात.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. मात्र नियोजन बदलावे लागेल. प्रवासात काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) फारशी अनुकूलता नाही. अष्टम स्थानी तीन ग्रह आहेत. जपून पावले टाका. संततीशी वादविवाद संभवतात.उपासना करा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  घरगुती गोष्टीत वेळ व्यतीत होईल. प्रिय व्यक्तीची नाराजी जाणवेल. भागीदारी व्यवसायात संयम ठेवावा लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक बाजू मजबूत होईल. विजयी मार्गक्रमण कराल. शत्रूचा त्रास जाणवेल. गुपिते उघड करू नका.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. संततीची काळजी वाटेल. विनाकारण धाडस नको. प्रेमात परीक्षा घेतली जाईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  तुमच्याच राशीत चंद्र आहे. घरगुती कामासाठी वेळ द्याल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.मात्र फारसे यश मिळणार नाही.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रतिकूल दिवस आहे.काही सुखद अनुभव येतील.कलाकारांना संधी मिळतील.सरकारी कामे मार्गी लागतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.