आजचे राशिभविष्य बुधवार,२२ मे २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख शुक्ल चतुर्दशी.ग्रीष्म ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज विशाखा, वर्ज्य दिवस आहे”*नागपूर,चंद्रपूर भागात आज नृसिंह जयंती आहे*
नक्षत्र – स्वाती/विशाखा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -तुळ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल शनीची चंद्राची शुभ योग आहे. शुभ समाचार समजतील. नवीन संधी चालून येतील.पत्नीशी मतभेद टाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरीत काही मनासारखे बदल घडतील. वरिष्ठ खुश राहतील. आर्थिक लाभ होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आध्यत्मिक प्रगती होईल. मार्ग सापडेल. समस्या दुर होतील. सिद्धी प्राप्त होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पीडा कमी होतील. मन प्रसन्न राहील. घरात मन रेंगाळले. नोकरीत कटकटी वाढतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. वाहन सौख लाभेल. कोर्टात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल शनी उत्तम धन मिळवून देत आहे. आज जोरदार व्यावसायिक प्रगती होणार आहे. आळस झटकून कामाला लागा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्याच राशीत चंद्र आहे. उत्साह वाढेल. अडचणी दूर होतील. मेजवानी मिळेल. परदेशगमन घडेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. व्यवहारिक लाभ होतील. गुंतवणूक योग्य ठरेल. खर्च वाढतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल चंद्र आहे. ऐश्वर्य प्राप्त होईल. मनासारखी कामे होतील. प्रगती साधाल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजाधिकार प्राप्त होईल. अंदाज अचूक ठरतील. धनधान्य वाढेल. उधारी टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) “भय इथले संपत नाही” अशी परिस्थिती आहे. श्री. हनुमान उपासना करा. शौर्य दाखवाल. लहान सहान विचार आणि चिंता सोडून द्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे.व्यय स्थानी शनी आहे.अष्टम चंद्र आहे. जपून पावले टाका.काही सुखद घटना घडतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार,या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.