मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रु अनावर झाले. कालच्या या त्यांच्या निर्णयानंतर विशाल आणि इतर सदस्य त्यांची आज मते मांडताना दिसणार आहेत.
याचसोबत दोन दिवस रंगलेल्या या बिग बॉसच्या चावडीमध्ये काहींची कानउघडणी झाली, काहींना महेश मांजरेकर यांनी समजावून सांगितले आणि काही सदस्यांना ते कसे आणि कुठे चुकले हे देखील दाखवून दिले. वूटद्वारे आलेल्या काही अतरंगी डिमांडसाठी जय आणि विशाल राजी झाले आणि जयने त्यामध्ये बाजी मारली. त्याचसोबत चुगली बूथद्वारे जयच्या फॅनने त्याला चुगली केली आणि विकास – विशाल काय म्हणाले हे उघड केले. बघूया या नव्या आठवड्यात कोण कोणाला भिडणार ? कोणते नवे टास्क रंगणार ? कोण बाजी मारणार ? कोणाच्या हाती हार येणार ? कोणाला मिळणार कॅप्टन बनण्याचा बहुमान ?
शिवलीला यांच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भावुक झाला. तो त्याच्या भावना सोनाली, मीनलला सांगताना दिसणार आहे. विशाल म्हणाला, “ ती असायला हवी होती, खूप काही शिकवून गेली. तिने जो विश्वास दाखवला आहे आपल्यावर तो कधी नाही मोडणार. ते असतना काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे”… मीनलने देखील सांगितले, “ती कशी होती आपल्यालाच माहिती आहे… तिच्यासारखी मुलगी मी नाही बघितली कधीच. तिला इतक नॉलेज आहे त्याच्यासमोर कोणीच काही नाहीये.
पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.