सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुढाकाराने रंगणार ऑनलाईन कॅलिफेस्ट २०२१
मुंबई – सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुढाकाराने साजरा होणारा भारतीय लिप्यांचा उत्सव -`कॅलिफेस्ट ‘ यंदा अधिक व्यापक स्वरूपात होणार आहे. यंदाचा हा ५ वा कॅलिफेस्ट भारतीय लिप्यांची सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पदार्पण करणार आहे. ९ आणि १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० ते ८:३० या वेळेत होणा-या या ऑनलाईन उत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ६ आंतरराष्ट्रीय सुलेखनकारांसोबत त्यांच्या लिप्यांवर प्रात्यक्षिकांसोबत चर्चा, प्रश्नोत्तरे व संवाद साधण्याची मिळणारी सुसंधी. सुलेखन कलेच्या साधकांसाठी आणि रसिकांसाठी हा उत्सव पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.
आपल्याकडील सुलेखनकारांमध्ये सतत मनात कुतुहूल असते कि त्यांची काम करण्याची पद्धत काय व कशी आहे, हे नेमके यातून सगळ्यांना समजणार आहे. चर्चेद्वारे नवीन दारे उघडण्याची संधी नवीन येणा-या सुलेखनकारांना मिळणार आहे. सुलेखनकारांचा उत्साह वाढविण्याकरिता अच्युत पालव व Book a Workshop एकत्रितपणे ही संधी उपलब्ध करून देत आहेत.
सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील दिलेल्या लिंकवर जाऊन रजिस्टर करण्याची गरज आहे.
Schedule I
9 Oct. 2021
Estelle SO – Korean (5:30 to 6:30)
Michel D’Anastasio – Hebrew (6:30 to 7:30)
Katharina Pieper – Roman (7:30 to 8:30)
Schedule II
10 Oct. 2021
Ryoshu Yoshida – Japanese(5:30 to 6:30)
Bahman Panahi – Arabic (6:30 to 7:30)
Lilan PENG – Chinese (7:30 to 8:30)