नाशिक,दि,२ डिसेंबर २०२४ – शिवशाही बसमधील तांत्रिक दोष समोर आल्याने एसटी प्रशासनाकडून बसची सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार असल्याची शक्यता आहे.वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेऊ शकतात आहे. शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाल्यावर प्रशासन हा मोठा व महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते.अशी माहिती समोर आली आहे.
लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा असतो. एसटी महामंडळाने एसटीच्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत. शिवशाही, शिवनेरी, एसी बस यासारख्या अनेक बस खेडोपाड्यात धावत असतात.मात्र, आता एसटी महामंडळाने शिवशाही बस बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात ‘लालपरी’ बसमध्ये होणार असल्याची शक्यता आहे. अलीकडेच गोंदिया येथे शिवशाही बसच्या अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीदेखील शिवशाही बसचे अपघात झाले होते. शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता आधापासून त्यात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
गोंदियात शिवशाही बसचा अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता बसबद्दल तक्रारी समोर आल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी याआधी शिवशाही बसचे अपघात झाले आहेत. बसमध्ये तांत्रिक दोष असल्याचंही आढळून आलं होतं.दरम्यान, आता राज्य परिवहन महामंडळाकडून आता शिवशाहीला ब्रेक लावला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. बसमधील तांत्रिक दोष समोर आल्याने हा निर्णय घेतला असल्याचं समजते. शिवशाही बस बंद करून या बसेसचं रुपांतर लालपरीत होणार आहे.
शिवशाही बसमध्ये असलेल्या तांत्रिक दोषांकडे याआधी एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं. पण शिवशाही बसचे वाढते अपघात आणि तक्रारींमुळे शेवटी शिवशाही बस सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. यांत्रिक विभागाकडूनही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एसटी सेवेतून शिवशाही महिन्याभरात बंद होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात ८९२ शिवशाही बसेस असून ५०० बस रस्त्यावर धावत आहेत. तर ३९२ बस या वर्कशॉपमध्ये आहेत.
शिवशाहीची सेवा बंद केल्यानंतर तिचं रुपांतर साध्या बसमध्ये केलं जाणार आहे.बसमधील अंतर्गत आणि बाह्य भागात बदल केले जातील. काचा काढल्या जातील,सीटच्या रचनेत बदल केला जाईल. तसेच चालकांनी शिवशाहीबद्दल केलेल्या तक्रारींनुसार अडचणी दूर केल्या जातील.