मुंबई – ‘श्रावण मासारंभ’ असं म्हंटलं की घरात नवं चैतन्य, उभारी येते. वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य या महिन्यात केली जातात. श्रावण महिन्याचे काही अनन्यसाधारण महत्व आहे. श्रावण महिन्याचे औचित्य साधून कलर्स मराठी प्रेक्षकांना खास भेट देणार आहे. कलर्स मराठीवरील प्रत्येक मालिकेवर आजवर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे.
श्रावणात आता आपल्या आवडत्या मालिका आणि कलाकार म्हणजेच राजा रानीची गं जोडी मालिकेतील संजू – रणजीत, बायको अशी हव्वी मालिकेतील जान्हवी आणि विभास, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लति -अभि, जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा आणि मल्हार, शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील शर्वरी – शंतनू आता रविवारीही देखील भेटीला येणार आहेत आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर.
तसेच बाळूमामाच्या नावानं चांगभलं आणि जय जय स्वामी समर्थ मालिकेतून स्वामीं समर्थांच्या आणि संत बाळूमामांच्या लीला देखील रोज बघायला मिळणार आहेत. तेंव्हा नक्की बघा “रविवार श्रावणसंध्या” ८ ऑगस्टपासून दररोज संध्या ७ ते रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजू आणि रणजीतसमोर कुठलं नवं संकट उभं येऊन ठाकणार आहे ? रणजीत आणि कुसुमावती मधील अबोला दूर करण्यात संजू यशस्वी होईल का ? संजू आणि रणजीत मिळून अपर्णाचं सत्य ढालेपाटील कुटुंबासमोर कसं आणणार ? आणि दोघं मिळून तिला कायमचं घराबाहेर काढू शकतील ? सुजितला अपर्णासोबतच्या जबरदस्तीच्या नात्यातून संजू सोडवू शकेल ? हे कसं साध्य करतील ? राजा – रानीच्या आयुष्यात कुठले अडथळे, संकट येणार आहेत ? आणि त्यांच्यावर ते कसे मात करतील, आजवर दोघांनी मिळून प्रत्येक अडचणीवर मात केली आहे यापुढचा त्यांचा प्रवास कसा असेल हे बघूया मालिकेमध्ये.
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये लतिका आणि अभिमन्यूमधील दुरावा अजून कायमच आहे. पण येत्या भागामध्ये आता बापू त्यांच्या सर्व अटी मागे घेणार आहेत, लतिकाला हे देखील सांगितले आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असं काय घडणार आहे लतिकाच्या आयुष्यात ज्यामुळे इंदू लतिकाला अट घालणार आहे. काय अट असेल ती ? अभिमन्यू – लतिकाच्या नात्याला कुठलं नवं वळण मिळणार ? हेमा आणि दौलत पुढे कुठला कट रचणार आहेत. अभिमन्यूसमोर आता मोठा पेच उभा ठाकला आहे त्याला लतिकासोबतच बापू आणि संपूर्ण कुटुंबाची मनं जिंकायची आहे ? अभिमन्यू जिंकू शकेल का त्यांची मने ? अभिमन्यू लतिकामधील दुरावा कायमचा दूर होईल ?
बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये कुलकर्णी त्याचे प्रस्थ वाढविण्यासाठी जागा शोधतो आहे जिकडे त्याला त्याचा मठ उभारायचा आहे. जसा मामांचा तळ आहे तसच त्याला त्याचा मठ उभा करायचा आहे. दुसरीकडे बाळूमामा कुलकर्णीच्या समोर येणार आहेत. बाळूमामा कुलकर्णीला भेटायला जाणार त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटतं. पण जिथे बाळूमामा कुलकर्णीला गोड भाषेत खडसावतात. काय सांगतिल बाळूमामा कुलकर्णीला ? जय जय स्वामी समर्थ मालिकेत राधा नामक महिलेची एंट्री झाली आहे. दुसरीकडे दाजीबा त्रस्त झाला आहे, कसं बुवामुळे त्याचं प्रस्थ कमी होत चाललं आहे आणि यावरच राधा म्हणते की, मी आली आहे ना आता काळजी नको करूस. नक्की काय घडणार आहे मालिकेत ? दाजीबाचा डाव होणार का यशस्वी की त्याला येणार स्वामींच्या महिमेची प्रचिती… आपल्या लाडक्या मालिकांमध्ये पुढे काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी बघत रहा कलर्स मराठी.
बायको अशी हव्वी मालिकेत जान्हवीने ठाम निर्णय घेतला आहे. ती घरातील लोकांची विचारसरणी बदलणार, पण घर सोडून मात्र जाणार नाही. जान्हवी बायको म्हणून, घराची सून म्हणून अगदी मनापासून तिचं कर्तव्य पार पाडते आहे. पण विभास तिला समजून घेईल ? विभास त्याचा हेकेखोरपणा, पुरुषी अहंकार बाजूला ठेऊ शकेल ? जान्हवीच्या या प्रवासात ती राजेशिर्के परिवाराचा विश्वास संपादन करू शकेल ? किती कठीण असणार तिचा हा प्रवास आणि ती यावर कशी मात करेल हे मालिकेत बघायला मिळणार आहे.
शुभमंगल ऑनलाइन लाइकेत ओमच्या येण्याने शंतनू – शर्वरीच्या नात्यात दुरावा येणार नाही ना? जीव माझा गुंतला मालिकेमध्ये अंतराचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने मल्हार श्वेतासाठी सरप्राईझ प्लॅन करतो पण खरतर वाढदिवस अंतराचा असल्याने श्वेता घाबरते. पत्रिकेतील गोंधळामुळे मल्हार आणि घरच्यांना असं वाटत आहे की, वाढदिवस श्वेताचा आहे ? या झालेल्या गोंधळामुळे पुढे काय होणार ? श्वेताचं सत्य शितोळे कुटुंबासमोर येणार ? चित्रा कोणती खेळी खेळणार ? नियती प्रत्येकावेळा मल्हार आणि अंतराला एकत्र आणू पाहते आहे पण नक्की काय होणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेंव्हा नक्की बघा “रविवार श्रावणसंध्या” ८ ऑगस्टपासून संध्या ७ ते रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर रसिकांना बघायला मिळणार आहे.