मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठा निर्णय घेण्यात आला.राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने ११ हजार ५०० कोटी रुपये इतक्या तरतुदीस मान्यता दिली असून, यामधून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाईल. आपत्तीग्रस्त नागरीकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मदत व पुनर्वसन विभागा तर्फे पूरग्रस्त भागातील नुकसानी बाबत सादरीकरण करण्यात आले. या निधीपैकी मदतीसाठी १५०० कोटी रुपये, पुनर्बांधणीसाठी ३००० कोटी व बाधित क्षेत्रात सौम्यीकरण उपाययोजनांसाठी ७००० कोटी खर्चास मान्यता देण्यात आली.
Next Post