नाशिक – नाशिक शहर परिसरात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पहिला पूर आला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणातून कल पासून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण ७८ टक्के भरले असून त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.काल सायंकाळ पासून पाण्याचा विसर्ग सुरु असून दुतोंड्या मारुतीच्या कमरे पर्यंत पाणी आले आहे.
गोदावरी पात्रातील कॉक्रीट काढल्यामुळे पाण्याची वहन क्षमता वाढली – देवांग जानी
गोदावरी नदीला आलेला या हंगामातील पहिला पूर या पुराची खासियत म्हणजे, गोदा नदीपात्रातील ज्याभागातत तळ सिमेंट-कॉक्रीट काढण्यात आलेले आहे त्याकुंडातील पाण्याची वहन क्षमता वाढली असून पात्र ओलांडून पाणी पटांगणात येत नाही. कॉक्रीटीकरणमुक्त गोदासाठी आपण दिलेल्या लढ्यामुळे शक्य झाले. (थोडक्यात ३.२५ मीटर पुराची तीव्रता कमी झाली) असे गोदावरी प्रेमी सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी जनस्थानशी बोलतांना सांगितले