सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र 

0

हरिअनंत,नाशिक 

रवि-शनि युतीवर  जन्माला येणाऱ्यांना धातूची कामे,मातीची चित्रे,भांडी घडविणारे असे उद्योग उत्तम प्रकारे जमतात रवि-शनि युती चतुर्थ स्थानात असता  उद्योगधंद्यात अनेक अडचणी,नोकर असल्यास वरिष्ठांशी पटणार नाही. घराण्यात,प्रतिष्ठेत कमीपणा,घराणे सुखात नांदनार नाही.अशुभ योग असता विशेष दिसून येईल. ही रवि- शनि युती जर धनु व मीन राशीत युती होईल , तर अनुकूल फळे थोडी जास्त  दिसतील.

रवि- शनि युती नवम स्थानी किर्ती,  उद्योगधंदा यांचा नाश करणारी ठरते. भाग्योदयात अडथळा.रवि- शनि युती दशम स्थानात चांगली नाही. या योगाने अभ्युदयात अडथळे.  नोकरीत नित्य वरिष्ठांशी विरोध, तंटेबखेडे, मानहानी, नुकसान पोहोचेल.त्यातल्या त्यात धनु राशीत ही युती अति अरिष्टकारक समजावी तसेच मेष, वृश्चिक राशीत  युती थोड्या फार फरकाने अनुभवास येतील..

रवि- शनि युती द्वादश स्थानी  झाली असता उदयोगधंद्यात नुकसान, अपकीर्ती, व्यसनाधीन लोकांचा संग, तुरुंगवास हे युतीचे प्रामुख्याने गुणधर्म 1/8 राशीत युती असता प्रतिकूल फळे दिसतील. इतर राशीत फळाची तीव्रता कमी. 7/10/11 राशीत समान वाटेल अशी फळे मिळणं कठीण. 

रवि – शनी धातूचा ज्ञाता,विद्या बुद्धी-रवि-शनि मंद बुद्धी, फितूर होणारा स्वभाव, उपासना, अध्यात्म,,रवि-शनि शुभयोग व्यवहारदक्ष, काटकसर,श्रमाची आवड,हाच अशुभ योग असता दृढ निश्चय,धैर्य, बुद्धिमत्ता, तेथे बुध असता जास्त दिसून येते.आपमतलबी, कोणास उपयोगी पडणार नाही. रवि-शनि-राहू-केतू युती षष्ठस्थानी वृत्ती क्षुद्र,फाजील विश्वास,अतिशय घमेंड,स्वतःहून शत्रुत्व वाढवून नुकसान करून घेतात.

रवि-शनि युती नवमस्थानी असता सदाचाराचे व सतप्रवृत्तीचे अतिशय वावडे,मन सतत संशयग्रस्त व मत्सरी,चित्तात स्वस्थ कधीच नसते. शांतपणे झोप नसते. भयानक स्वप्न पडतात.

जादूटोणा वगैरे करण्याकडे प्रवृत्ती.द्वादशस्थानी रवि-शनि युती असता  आस्तिक स्वभाव..धार्मिक कार्यासाठी भरपूर खर्च करणाऱ्या या व्यक्ती. एखादा मदत मागायला आला , तर मनात कुठलाच संशय न करता मदत करणारे.माता,पिता,आप्त यांचे सुखदुःख: रवि-शनि चतुर्थ स्थानी प्रसूतीचे वेळी मातेस दुःख बरेच होते.

रवि-शनि,राहू-केतू षष्ठ स्थानी युती  आजोळची स्थिती सामान्य,सौख्य मिळत नाही. चुलतीला दीर्घ आयुष्य Gलाभत नाही. तिचे पासून सुख मिळत नाही. इच्छा नसताना आजोळी राहून कष्ट करावे लागतात. रवि- शनि युती अष्टमात जाहली असता सासू-सासरा, मेहुणे मेहुणी यांचे स्वभावभिन्नतेमुळे सौख्य लाभत नाही.रवि-शनि युती नवमस्थानी झाली असता मातृ-पितृ सुख (क्रमशः) भाग -१३४

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

 

संपर्क – 9096587586

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.