रवि-चंद्र-मंगळ-गुरू-शनि : श्रीमान सत्ताधीश,कर्तृत्ववान, राहणी अतिशय घाणेरडी,पापी,परस्त्रीकडे पहाणारा,नावे बदलणारा. संपत्ती,अधिकार यांचा योग्य उपयोग करणारा, युद्धकुशल,धनवान,प्रभावाने सत्ता मिळवणारा.
रवि-मंगळ-बुध-शुक्र-शनि :कर्तबगार, प्रसिद्धी पावणारा, स्थिर वृत्ती, शेवटी दुःख, भय, क्षुधा याने पीडित, आयुष्य शेवटी वाईट अवस्थेत घालविणारा, निर्धन, उंच बांध्याचा, पुत्र मरण पावलेला, अनेक रोगाने पीडित.
रवि-मंगळ-शुक्र-गुरू-शनि :सर्वत्र पूज्य, श्रीमंत आयुष्याचे उत्तरार्धी,अंध, मित्रआप्त पुष्कळ, जासूद, निर्धन,धूर्त , नवीन वेष धारण करणारा, अति मूर्ख
रवि-बुध-गुरू-शुक्र-शनि : आत्मज्ञानी ,सत्कृत्ये, पुण्यकृत्ये करणारा, गुरुभक्त्ती, गुरुसेवा करणारा, अनेक शास्त्रात निपुण, शेवटी संन्यास योग,
रविचे पाच ग्रहांच्या युतीचेआलेले अनुभव योग
रवि-चंद्र-मंगळ-बुध-शनि : ही युती ज्योतिष शास्त्रात फार मोठा विचित्र योग मानतात. स्वतः अल्पायुषी पण 2/4/6/7/8/12 या स्थानात होईल तर आईबाप लहानपणी जाण्याचा संभव .त्यानंतर भाग्योदय होतो. मोठा अधिकार भोगेल; पण अंगावर लफडी गुरफटून बसेल. नेहमी लोकांना बदसल्ला देईल. खोटी सही, खोटे कागद, खोटी साक्षपुरावे देईल. प्रपंचाकडे लक्ष नसते. जर सरळ मार्गाने जाईल तर यंत्र, साहित्य- संपादक, ग्रंथ- प्रकाशक वगैरे उद्योग करील.
रवि-चंद्र- मंगळ-शनि : धडाडी कमी, आई- वडील, भावंडे यांचे सौख्य कमी, नोकरी न करणे फायदेशीर, माता- पिता यांच्या पश्चात भाग्योदय, शांततेत आयुष्य घालवितात. वकिली व्यवसायाकडे कल असतो.
रवि-चंद्र-मंगळ-शुक्र-शनि :या योगात आई- बाप लहानपणी जातात. जगलेच तर वैर होते.पश्चात भाग्योदय, खूप पैसा मिळतो.यंत्रशास्त्र,जहाजविद्या यात फार प्रवीण असतात.कोणाचेच सौख्य कुटुंबात मिळत नाही. उच्च परिस्थितीला मात्र चढतो. सुखी आयुष्य.
रवि-चंद्र- बुध-गुरू- शनि :ही एक ज्योतिषशास्त्रात अगम्य युती आहे. स्वतः अल्पायुषी, माता- पित्याचा लहानपणी मृत्यू, नेहमी आजारी. शिक्षण कमी, धंदा होत नाही. नोकरीच करावी लागते. बुद्धी वेड्यासारखी, शारीरिक व्यंगाची शक्यता(क्रमशः)भाग-१४१