मुळा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

डॉ.राहुल रमेश चौधरी

0

डॉ.राहुल रमेश चौधरी
आपण सॅलड मध्ये ज्याप्रमाणे गाजर,बीट,टोमॅटो,काकडी बघतो त्यात मुळ्याचा देखील हमखास समावेश
असतो.खान्देशात वांग्याच्या भरतासोबत मुळा कांद्याचा वापर हमखास होतो.मुळ्याची भाजी त्याच्या
येणाऱ्या वासामुळे नाव ठेवण्यायोग्य झाली आहे,अन्यथा मुळ्याच्या पाल्याची व मुळ्याची भाजी मुगाची
डाळ टाकून केली जाते.खाण्यासाठी कोवळा मुळा वापरावा असे आयुर्वेद शास्त्र सांगते.

मुळ्याचे गुणधर्म खालीलप्रमाणे.
१.अंग दुखणे,सूज येणे,ही लक्षणे शरीराच्या विशिष्ठ भागात असतील तर मुळ्याचा किस रुमालात घेवून
शेकावे.
२.पोटात गॅस होवून पोटदुखी,बेचैनी,अस्वस्थता,ही लक्षणे असतील तर मुळ्याचे तुकडे मीठ,लिंबू हे पदार्थ
वापरावेत.
३.पोटात वायु अडकून ढेकर येतात अश्या वेळी कच्चा मुळा जेवणासह थोडा थोडा खावा.पोटात जास्तत
जास्त वेळ राहण्याच्या स्वभावाने व वायुच्या अनुलोमन म्हणजे वात स्वभावत: खालच्या बाजूने निस्सारण
करण्यामुळे योग्य तो लाभ होतो.
४.डांग्या खोकला मध्ये त्रास कमी करण्यास मुळ्याचा रस मिरे सैन्धव हे मिश्रण ३-३ तासांच्या अंतराने
घ्यावे.
५.अंगावर मेदाच्या गाठी झाल्यास मुळ्याचा रस गाठींवर चोळावा याने मेदाचे पचन होवून गाठी कमी
होतात.
६.वारंवार घसा खाकरणे,आवाज बसणे,तोंडास पाणी सुटणे यात मुळ्याचा किस हळद लावून खावा.
७.जेवण केल्यावर मोकळा ढेकर न येणे,वरचेवर रिकाम्या पोटी ढेकर येत असल्यास मुळ्याचा वापर
करावा.
८.भूक न जाणवणे,तोंडास-जिभेस-घशास जडपणा जाणवणे या तक्रारी असल्यास कोवळा मुळा पाण्यात
उकळून त्याचे सूप करून त्यात जीरे,काळी मिरी,कोथींबीर टाकून जेवणाच्या सुरुवातीला प्यावे.
९.जेवणावर वासना नसणे,सारखी सारखी सर्दी होणे,खोकला येणे या तक्रारींमध्ये मुळा मूग याचे कढण
मिरे,सैन्धव,ओवा,मध घालून प्यावे.
१०.लघवीस कमी होणे,संथ गतीने होणे या तक्रारींसाठी मुळ्याचा पानांचा रस सकाळी रिकाम्या पोटी व
सायंकाळी घ्यावे.
११.कावीळ या आजारात शौचास पांढरे भसरत होणे,भूक संपूर्ण संपणे,सर्वांगात जडपणा जाणवने ही
लक्षणे असल्यास मुळ्याच्या पानांचा रस,काळी मिरी पाव चमचा रोज ४ वेळा घ्यावे याने कावीळ बरी
होते.
१२.मुतखडा लहान असेल तर मुळ्याचा पानांचा रस,धने चुर्ण एक चमचा मिश्रण घ्यावे याने मूतखडा
होण्याची सवय कमी होते.
१३.मुळ्याचे बी हळदीसह वाटून लेप करून गजकर्ण व्रर करावा याने खाज कमी होते.
१४.मुळ्याचे बी १ चमचा लोणी मध यासह घ्यावे याने शुक्रवृध्दी होते.
१५.लहान मुलांना जंताची सवय असल्यास मुळ्याचा रस मध व नतर काही वेळाने एरंडेल घेतल्यास जंत
नाश होतो.

सावधान..!!

१.मुळा चे लवकर पचन होत नाही तो दिर्घकाळ पोटात राहत असल्याने रात्रीच्या जेवणात खावू नये.
२.दूध व मुळा एकत्र खावू नये
३.जुना मुळा खाण्यास वापरू नये.
४.मध व मुळा खावू नये.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी


औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र 

संपर्क-९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.