आजचे राशिभविष्य शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक कृष्ण सप्तमी, शरद ऋतू, दक्षिणयन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज संध्याकाळी ५.०० नंतर  चांगला दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र – आश्लेषा (संध्याकाळी ८.३६ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वास्तू विषयक निर्णय होतील. घरात काही मोठे बदल कराल. मन आनंदी राहील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गृहसौख्य लाभेल. संवाद होतील. लेखकांना चांगले यश मिळेल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कलाकारांना उत्तम दिवस आहे. नवीन घडामोडी होतील. मान सन्मान मिळतील. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अध्यात्मिक लाभ होतील. धार्मिक पर्यटन घडेल. उत्साह वाढेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) चिडचिड होईल. विनाकारण वाद होऊ शकतात. शांतता ठेवा.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. ठोस निर्णय होतील.
  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) धातू आणि रसायने यात लाभ होतील. यंत्रांशी संबंध येईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) भ्रमंती घडेल. अकल्पित धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात नवीन ओळखी होतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभाचा दिवस आहे मात्र मेहनत वाढवावी लागेल. क्रोध आवरा.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अडचणींवर मात कराल. राजकारणात यश मिळेल. छुपे शत्रू त्रास देतील.  
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) महत्वचे निर्णय घ्यावे लागतील. कामे लांबणीवर टाकू नका. आळस नको. 
 
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) संवाद कौशल्य कामी येईल. गूढ विद्या, रहस्य यात मन रमेल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.