आजचे राशिभविष्य सोमवार, ६ डिसेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल तृतीया, दक्षिणायन, हेमंत ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 
आज उत्तम दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – पुर्वाषाढा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- दूरच्या नात्यातून लाभ होतील. शेअर्स मध्ये जपून गुंतवणूक करा. अंदाज चुकू शकतात. मन स्थिर राहील.    
     
वृषभ:- मनात वाईट विचार येऊ शकतात. आत्मविश्वस कमी होईल. आरोग्यावर परिणाम करणारा दिवस आहे.  
 
मिथुन:- जोडीदाराकडून सुख लाभेल. दिवस आनंदात जाईल. प्रेमात यश मिळेल. संशयकल्लोळ टाळा.
 
कर्क:-  आर्थिक विकास करणारा दिवस आहे. दीर्घकालीन नफ्याचे नियोजन होईल. अंदाज अचूक येतील. 
 
सिंह:- संततीवर लक्ष ठेवावे लागेल. चुकीच्या संगतीचे योग आहेत. काळजी घ्या. धाडसी निर्णय नकोत.
  
कन्या:- धातू संबंधित कामात यश मिळेल. व्यवसायात वृद्धी होईल. घरात काही बदल कराल.
 
तुळ:- व्यवसायात वाढ होईल. धार्मिक लेखकांना यश मिळेल. कीर्ती पसरेल.
 
वृश्चिक:- कुटुंबास अधिक वेळ द्यावा लागेल. विनाकारण वाद होतील. अचानक धनलाभ होईल.
 
धनु:- धार्मिक यात्रा घडेल. छोटे प्रवास होतील. मेजवानीचे योग आहेत.
 
मकर:- दिवस सुखात जाईल. मन आनंदी राहील. खर्चात वाढ होईल. चैनीवर खर्च कराल.
 
कुंभ:- भौतिक सुखे मिळतील. स्वप्ने साकार होतील. आनंदी राहाल.  
 
मीन:- मौल्यवान खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी आनंद निर्माण करण्याऱ्या घटना घडतील. मनासारखी कामे होतील. अधिकार वाढतील.
 
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 
 
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.