ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा/ द्वितीया, दक्षिणायन, हेमंत ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज क्षयदिन आहे.
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठ/ मूळ
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- कर्जे मंजूर होतील. वारसा हक्काने फायदा होईल. गुंतवणूक मधून लाभ देणारा दिवस आहे.
वृषभ:- आरोग्य सांभाळा. कठोर बोलणे टाळा. वाहन जपून चालवा. आध्यत्मिक लाभ होतील.
मिथुन:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होईल. पत्नीकडून लाभ होतील. मोलाचा सल्ला मिळेल.
कर्क:- उत्तम दिवस आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. वेळ दवडू नका.
सिंह:- नात्यातून लाभ होतील. संतती संबंधित शुभ समाचार समजतील. योग्य निर्णय घ्याल.
कन्या:- गृहसौख्य लाभेल. कुटुंबास वेळ द्याल. घरात काही मोठे बदल कराल. जमीन व्यवहारात यश मिळेल.
तुळ:- आर्थिक उन्नतीचा दिवस आहे. मोठे व्यवहार होतील. नातेवाईक मदत करतील.
वृश्चिक:- प्राध्यापक, वकील मंडळींना अनुकूल दिवस आहे. वक्तृत्व चमकेल. कुटुंब सुख मिळेल.
धनु:- अत्यन्त चांगला दिवस आहे. आयुष्याचा अर्थ समजेल. गुरू सन्निध लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मकर:- खर्चात वाढ होईल मात्र तो खर्च योग्य कारणासाठी असेल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. दानधर्म कराल.
कुंभ:- उत्साह ववाढेल. मान सन्मान मिळतील. मन प्रसन्न राहील.
मीन:- सध्या साधारण परिस्थिती आहे. नेहमीप्रमाणे कामकाज चालू राहील.अकल्पित धनलाभ होऊ शकतो.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)