आजचे राशिभविष्य रविवार, २१ नोव्हेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक कृष्ण द्वितीया, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 
“आज उत्तम दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र: रोहिणी (सकाळी ७.३६ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम धनलाभ होईल. कामाचा ताण वाढेल. जबाबदारीचे भान ठेवावे लागेल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) खर्चात वाढ होऊ शकते. स्वतःसाठी महत्वाचे निर्णय घ्याल. वैयक्तिक लाभ बघितले जातील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मत्सर त्रास जाणवेल. शत्रूचे भय आहे. विजय तुमचाच होईल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्साह वाढवणारा दिवस आहे. भावुक व्हाल. हळवेपणाचा इतरांना गैरफायदा घेऊ देऊ नका.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक उलाढाल वाढेल. कामात बदल संभवतो. व्यवसायवृद्धी होईल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अकल्पित लाभ होतील. परतावा मिळेल. घरात काही महत्वपूर्ण कागदपत्रे सापडतील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सासुरवाडी कडून लाभ होतील. आरोगायचे प्रश्न निर्माण होतील. वाहने जपून चालवा.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मानसिक स्वास्थ्य लाभेल. विश्रांती घ्याल. पाण्यापासून सावधानता बाळगा.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. नोकर चाकर मात्र त्रास देतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गूढ आणि रहस्यमय अनुभव येतील. अचानक धनलाभ संभवतो. काव्यात रंगून जाल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) जमीन संबंधित कामातून यश मिळेल. धातूच्या व्यवसायात लाभ होतील. आईची काळजी घ्या.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चांगला दिवस आहे. काही नवीन करार किंवा बोलणी होऊ शकते. आळस झटकून कामाला लागा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.