माय मराठीचा जयजयकार करणारे ‘गोदाकाठी मायमराठी’ साहित्य संमेलन गीत ठरतंय लक्षवेधी 

मिलिंद गांधींच्या गीताला संजय गीतेंचा स्वरसाज  व्हिडीओ पहा

0

नाशिक ( प्रतिनिधी) – नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाचा भूमिपूजन सोहळा काल संपन्न झाला. हा सोहळा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पांडेय,लोकहितवादी मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह मुख्य समन्वय समिती प्रमुख विश्वास ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला. हा सोहळा गोदाकाठी होत असल्याने त्याची उत्सुकता शिगेला पोहचली असून संमेलनाचे माय मराठीचा जयजयकार करणारे ‘गोदाकाठी मायमराठी’ हे मधुर स्वागत गीत व्हिडीओ लक्षवेधी ठरत आहे.साहित्यातून नाशिकच्या सौंदर्याचे केलेले ब्रॅण्डिंग चर्चेचा विषय ठरत आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत मेट भुजबळ नाॅलेज सिटित शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मंडपाचे भुमीपूजन झाले. यावेळी साहित्य संमेलनाच्या  व्हिडीओ  गीताचे  उद्घाटन झाले. या व्हिडिओत  नाशिकचे निसर्ग सौंदर्य,गडकिल्ले, सावरकर स्मारक, गंगापूर धरण व बोटक्लब, तपोवन, रामसृष्टी व अध्यात्म्याचे कोंदण लाभलेल्या गोदाकाठाचे चित्रीकरण रसिकांना भुरळ घालत आहे.

शिवाय साहित्यीक स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, नाटककार वसंत कानेटकर, वामनदादा कर्डक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. जगभरातील मराठी रसिकांना साहित्य संमेलन व पर्यटनासाठी नक्कीच नाशिककडे पाय वळतील, या पध्दतीने हा  व्हिडीओ  तयार करण्यात आला आहे.

संमेलन  गीताचे संगीत दिग्दर्शक-संजय गीते यांनी केले असून गीतरचना मिलिंद गांधी यांची आहे. प्रमुख गायक संजय गीते असून समूहस्वर सौरभ कुलकर्णी सागर कुलकर्णी मयुरी निमोणकर मृदुला कुलकर्णी श्रावणी गीते यांचे आहेत. बासरी वादन मनोज गुरव ,तबला बल्लाळ चव्हाण संगीत संयोजन अविनाश लोहार यांनी केले आहे. वाचन स्वर अनुराधा मठकरी यांचा आहे.

गीताचे ध्वनीमुद्रण-सोर्स म्युझिक स्टुडिओ,राजीवनगर नाशिक येथे करण्यात आले आहेत ध्वनिमुद्रक-सुमंत गीते, मास्टरिंग-शुभम जोशी. या गाण्याचे    व्हिडीओचे एडिटिंग निलेश सूर्यवंशी यांनी केले आहे.तसेच ऑडिओ व्हिडीओ मार्गदर्शन समीरभाऊ भुजबळ यांनी केले आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.