किचन कल्लाकारच्या सेटवर रंगली अनोखी संगीत खुर्ची

0

मुंबई – झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला. यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की  या किचन मध्ये भल्या भल्यांचा कस लागणार आहे.

आगामी भागात पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे या नेते मंडळींनी या सेटवर हजेरी लावली यात महाराज म्हणजेच प्रशांत दामले यांनी या तिन्ही नेत्यांना महाराजांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान दिलं आणि सुरु झाली एक स्पर्धा, पण महाराजांच्या आवडीचे हे पदार्थ तयार करत असताना या मंडळींना अनेक दिव्यातून जावं लागणार. विसरलेले पदार्थ पेठेतून आणण्यासाठी काहीठिकाणी युती तर काहीवेळा खुर्चीसाठी सामना करावा लागणार आहे. या तिघांनी सुद्धा मस्त मजेदार किस्से या भागात सांगितले. पंकजा मुंडे यांची गटारी अमावास्येला काय फजिती झाली? प्रणिती शिंदे यांनी पायलट सारखी घोषणा कशी केली? रोहित पवार यांनी कार्यक्रमात एका खेळात खुर्चीचा त्याग  केला आणि मग काय गुगली टाकली? हे जाणून घेण्यासाठी हा रंजक भाग चुकवू नका.

‘मस्त मजेदार किचन कल्लाकार’ ५ आणि ६ जानेवारी बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.