काय आहेत वाटाण्याचे आरोग्यास फायदे 

0
डॉ. राहुल रमेश चौधरी 
वाटाणा हा सर्वत्र तसा परिचितच..अगदी सगळीकडे मनसोक्त वापरला जाणारा वाटाणा लहानलहान घराघरापासून ते मोठ्या मोठया हॉटेल्स पर्यंत.या वाटाण्याचे बरेचसे प्रकार बघावयास मिळतात.रंगावरून व कच्चे –पिकलेले यावरून देखील.म्हणजेच काळा वाटाणा-पांढरा वाटाणा व  ओला वाटाणा-सुका वाटाणा.याचा उपयोग आमटीपासून ,रगडा पॅटीस सारखे बाहेरचे हातगाडीवरचे खाद्यपदार्थ येथपर्यंत सर्वत्र होतो.औषधांमध्ये याचा उपयोग फारसा होत नाही.कोकण-पंजाब-सिंध प्रांत अश्या ठिकाणी वाटाणा भरपूर प्रमाणात वापरला जातो.कोकणात काळा वाटाणा,पंजाबात ओला वाटाणा तर सिंध प्रांतात पांढरा वाटाणा भरपूर प्रमाणात खाल्ला जातो.याचे फायदे व निषेध खालीलप्रमाणे
 
१.ज्यांचे भूक अतिशय उत्तम आहे त्यांनी याचे सेवन करावे.
 
२.ज्यांना वजन वाढवायचे आहे व भूकही उत्तम आहे त्यांनी वाटाण्याचे उसळ खावी.याकरीता अंगास भरपूर तेलही लावावे व पचनशक्ती कमी होवू देवू नये.
 
निषेध-
 
वाटाण्याचे उपयोगापेक्षा निषेध जास्त महत्वाचे आहेत
 
१.नेहमीच्या वापराकरीता वाटाणा वापरू नये.
 
२.आमवात-संधीवात-वातरक्त या रुग्णांकरीता चालत नाही,वातुळ असल्याने त्रास वाढतो.
 
४.शरीरावर व्रण-जखमा पू तयार होत असेल तर पूर्णत: बंद असावा
 
५.ज्यांना सतत खडा शौचास होत असेल त्यांनी संपूर्ण टाळावा
 
६.अजीर्ण ,सतत पोटात गॅस पकडत असलेल्या रुग्णांनी टाळावा
 
७.आयुर्वेदात वाटाण्याला अतिशय वातकर असे म्हटलेले आहे व ते व्यवहारात दिसतेही त्यामुळे ते सर्वथा टाळावे ,खायचे असल्यास पचनशक्ती उत्तम ठेवावी.
Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी
औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   

संपर्क-९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.