नवे सदस्य कोणाला नॉमिनेट ? कोणाला करणार सेफ ?

जयचे प्रयत्न काही संपता संपेना ! जयचे स्नेहाला वचन...

0

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल तीन नव्या सदस्यांची एंट्री झाली. तृप्ती देसाईंनी विशाल, मीरा, मीनल यांचे भरभरून कौतुक केले आणि Looser हे लॉकेट सोनालीला दिले तर आदिशने देखील त्याला काय वाटते आहे ते सदस्यांना सांगून मीराला Looser हे लॉकेट दिले. घरामध्ये स्नेहाचे मात्र वेगळेच रूप बघायला मिळाले. घरातील काही सदस्यांना तो performance वाटला खरा पण, तिच्या वागण्याने आणि बोलण्याने घरातील एक व्यक्ति खूप दुखावली गेली जी तिच्या अत्यंत जवळची होती आणि तीव्यक्ति म्हणजे जय दुधाणे. त्या व्यक्तिला स्नेहाने Looser हे लॉकेट देखील दिले. त्यांच्या मैत्रीचा त्याने फायदा घेतला, तिच्यामागे त्याने तिच्याबद्दल बरेच काही बोले आहे अश्या अनेक गोष्टी तिने जयबाबतीत बोल्या आणि या सगळ्यात एक मैत्रीण गमावून बसलास असे देखील खडसावून सांगितले. आणि तेव्हापासून ही गोष्ट जयच्या मनात घर करून बसली आहे आणि त्याचे म्हणणे आहे काही गोष्ट मी नाही बोलो आणि काही गोष्टी मला बोलाव्या लागल्या… माझे दोन चेहरे नक्कीच आहेत पण… आणि बरंच काही संभाषण या दोघांमध्ये काल बघायला मिळाले. पण, या सगळ्यात स्नेहा तिच्या मतावर ठाम असल्याचे दिसून आले.

आज जय स्नेहासमोर माफी मागताना दिसणार आहे. तिच्यासमोर विनवणी करताना दिसणार आहे. त्याचा हा प्रयत्न काही संपता संपेना असं चित्रा कुठेतरी आपल्याला बघायला मिळणार आहे. जयचे म्हणणे आहे, एक गोष्ट लक्षात ठेव जे काही केलं ते खरंच मनापासून केलं. माझं काहीच intension नव्हतं तुला हर्ट करायचं, किंवा तुला खाली दाखवायचे, किंवा तुला बाहेर काढण्याचं, खरंच तुला जे वाटतं आहे ना जे काही तू बोलीस… and I am sorry … स्नेहाचे म्हणणे आहे, जर तुम्हांला वाटतं नाही तुमचं चुकलं आहे तर सॉरी बोलून काय उपयोग आहे? स्नेहाच्या म्हणण्यानंतर सुध्दा जयने तिची माफी मागितली. स्नेहाचे म्हणणे आहे जय जे काही बोलला आहे ते नॅशनल टेलिव्हीजनवर आहे. जयने स्नेहाला प्रॉमिस केले, की तो तिला कधी irritate नाही करणार …

नवे सदस्य कोणाला नॉमिनेट ? कोणाला करणार सेफ ?

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “खेळ खल्लास” हे नॉमिनेशन कार्य ! यामध्ये कोणाचा खेळ होणार खल्लास आणि कोणाला नवे सदस्य करणार सेफ? बघायला मिळणार आहे. या टास्कनुसार सदस्यांना घरातील सदस्य का अपात्र आहे याचे कारण द्यायचे आहे… आणि त्यानुसार सदस्य एलिमनेशनसाठी अनेक कारणे देताना दिसणार आहेत… आता ही कारणं घरात आलेल्या नव्या सदस्यांना किती पटणार आहेत ? आणि त्यांचा निर्णय काय असेल हे आज कळेलच.

या टास्कप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या नव्या सदस्यांना TOP ८ सदस्य आपल्याकडे ज्या स्पर्धकाची बाहुली आहे तो स्पर्धक घरात रहाण्यास का अपात्र आहे आणि ते का पात्र आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत… तर, दुसरीकडे स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य यांना एकमताने निर्णय घ्यायचा आहे की, त्यांना कोणत्या सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. विशाल स्नेहाला मीराबद्दल सांगताना दिसणार आहे, गेम खेळताना ती मला fair खेळताना दिसली नाही… तर मीरा आदिशला सांगताना दिसणार आहे, मी माझा स्वभाव नाही बदलू शकतं. गायत्री आदिशला सांगणार आहे, हे (म्हणजेच उत्कर्ष) त्यांचं डोकं पुर्णपणे वापरत नाहीत…

 

आदिश आणि विकासमध्ये सुरू आहे चर्चा ! “तू insecure वाटतोस बर्‍याचदा” – आदिश

घरामध्ये आज विकास आणि आदिशमध्ये चांगलीच चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये आदिश त्याला काही महत्वाच्या गोष्ट आणि त्याचं observation सांगताना दिसणार आहे.

आदिश विकासला सांगताना दिसणार आहे, तू insecure वाटतोस बर्‍याचदा असं फक्त मला नाही वाटतं इकडे अजूनही लोकांनादेखील वाटतं. आणि ते बघताना तसं जाणवतं. You are not secure about your position in the group, loyalty, असं वाटतं. मी असताना मला थोडा अनुभव यायचा. You are not sure… तुला काही लोकांना manipulate करता येतं आणि तूदेखील होतोस, झाला आहेस तू याआधी. लोकांचा तुझ्यावर विश्वास नाहीये ९० टक्के असेल पण १०० टक्के नाही होतं कारण कधी इकडे कधी तिकडे होतं तुझं… आता विकास त्याचा मुद्दा कसा मांडेल, त्याला काय सांगेल बघूया आजच्या भागामध्ये.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.