मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे कॅप्टन्सी कार्य. ज्यामध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार जय आणि विशाल यांना समर्थन देण्यासाठी काही गोष्टी गमवण्यास सदस्य तयार झाले. उत्कर्ष, मीरा, गायत्री आणि दादूस यांनी जयला समर्थन दिले तर, मीनल, विकास, सोनाली आणि नीथा यांनी विशालला समर्थन दिले.
आज स्नेहा कोणाला समर्थन देणार यावर आधारित आहे कोण बनणार घराचा नवा कॅप्टन विशाल की जय.
विशाल स्नेहाला सांगताना दिसणार आहे, “स्नेहा मी मानतो तर इथून मानतो, आधीसुध्दा मी होतो तुमच्याबरोबर आणि इथून पुढे देखील कायम राहीन. माझं प्रेम असंच आहे. विशाल तुम्ही मनं जिंकलं आहे. बिग बॉस मी समर्थन देते… बघूया स्नेहा कोणाला समर्थन देणार…
का आलं सोनालीला रडू ?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सोनालीला अश्रु झाले अनावर… कोणामुळे सोनालीला इतके वाईट वाटले आहे ? नक्की काय झालं ? हे आज विकाससोबत सोनाली शेअर करणार आहे.
विकास सोनालीला समजावताना दिसणार आहे. विकासचं म्हणण आहे, “ठीक आहे मीनलच्या बाबतीत काही गोष्टी आहेत. पण आता तुमच्या दोघींमध्ये काय नक्की, कुठल्या पॉइंटवरुन सुरू झालं आहे ? काय झालं आहे ? ते कळतचं नाहीये. ह्यांच्या बोलण्याने किंवा हे कसे react होत आहेत… आणि लोकांना जर हे दिसत आहे की तू genuine आहेस आणि तुला समोरून तितकसं मिळत नाहीये… तर उलट मग तुझा फायदा होतो आहे ना ? sympathy तुझ्याकडे येते आहे. ही पोरगी एवढी प्रयत्न करते आहे… त्यावर सोनाली काही वेगळंच म्हणाली, (गळ्यात घातलेली पाटी दाखवून) आणि हे वाक्य… किती मोठं वाक्य आहे हे ! त्यावर विकास म्हणाला, पण सोनाली हा चॉइस तुझ्याकडे होता ना, ते गळ्यात घालायचे की नाही… हा चॉइस तुझा आहे ना ? नाही म्हणू शकली असतीस…
आजच्या भागामध्ये अजून पुढे काय चर्चा होणार या दोघांमध्ये. बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.