एच ए एल कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक घेण्यास शासनाने दिली परवानगी 

0

ओझरटाऊनशिप (प्रतिनिधी) – येथील एच.ए.एल.कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक घेण्यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याच्या  लेखी आदेशानुसार  जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन आता  संघटनेची निवडणूक केंव्हा जाहिर होणार या कडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

एच ए एल  कामगार संघटनेचा कार्यकाळ १५ जुन रोजी संपुष्टात आला त्यानंतर निवडणूक होणे गरजेचे होते परंतु कोरोनाचे कारणास्तव जिल्हा आपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे कडून निवडणूक घेण्यासाठी  परवानगी मिळत नव्हती  दरम्यान निवडणूक घेण्यास परवानगी मिळावी अशी मागणी कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस संजय कुटे, माजी सहचिटणीस अनिल मंडलिक व विद्यमान पदाधिकारी गिरिश वलवे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व कामगार उपायुक्त यांचेकडे  स्वंतत्र रीत्या वेगवेगळे  निवदनाद्वारे करून पाठपुरावा केला होता.

त्याच पार्श्वभूमीवर शासनाने कामगार संघटनेची निवडणूक प्रक्रिया राबविण्यास  परवानगी दिली असुन  शासनाने तसा  लेखी आदेश जिल्हाधिकारी मांढरे  यांना काल रोजी दिला या आदेशा नुसार जिल्हाधिकारी मांढरे यांनी आज निवडणुक घेण्पासाठीचे परवानगीचे लेखी पत्र एच ए एल व्यवस्थापन व कामगार संघटना यांना दिले आहे कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणूक घेण्यासाठी शासनाने व जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.