नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो.अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. यंदा नवरात्री सूर्यग्रहण आणि सर्वपित्री अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर २३ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा उत्साह असणार आहे. या नऊ दिवसात घटस्थापनेसह गरबा दांडियाचा उत्साह नऊ दिवस रंगतो. या नऊ दिवसात नऊ रंगांचे कपडे परिधान केले जाता.
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा ते प्रसिद्ध केले जातील email jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)
आजचा रंग पांढरा

फोटो पाठवताना आपल्या ग्रुप च्या नावाचा उल्लेख असावा
email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा





