नाशिक,दि,१९ जानेवारी २०२३ –सकाळची बोचरी थंडी…कॉलेज जीवनातील आठवणी जुन्या मित्रांच्या भेटी…सोबतीला वाफाळलेला चहा अन् आठवणींत मित्रमंडळी पुन्हा एकदा कॉलेज रोडवर रमणार आहेत. जनस्थान आणि ११:३०@ सलीम या गृपतर्फे उद्या शनिवार दि. २० जानेवारीला सकाळी ८ ते १२ या वेळेत सलीम टी स्टॉल श्रद्धा पेट्रोल पंपा शेजारी “आठवणीतला चहा’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे ६ वे वर्ष आहे अशी माहिती जनस्थान चे प्रमुख अभय ओझरकर आणि ११:३० @ सलीम या ग्रुपचे प्रसाद गर्भे यांनी दिली.
कार्यक्रमाची संकल्पना आर जे भूषण मठकरी,रवी जन्नावार,नंदन दीक्षित यांची आहे.’आठवणीतील चहा’ या उपक्रमाचे.’जनस्थान’ या कलावंतांच्या व्हॉट्स अप ग्रुपतर्फे या उपक्रमाचे खास आयोजन करण्यात येते माणसांच्या बरोबर शेवटपर्यंत येते ती म्हणजे आठवण आठवणीच्या पलीकडे माणसाकडे काहीच होत नाही असाच एक कार्यक्रम म्हणजे आठवणीतला चहा सलीम मामू सलीम टी स्टॉल फार महत्त्वाचं नाव ज्या नावा शिवाय कॉलेज पासून सुरू झालेला आयुष्य ते संपत पर्यंत सलीमच्या शिवाय नाव पूर्ण होऊ शकत नाही अशा या नावासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यावर्षी या कार्यक्रमात गप्पा सोबत गायन वादन असा ही कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी गोदा श्रद्धा फाउंडेशनचे सुरेश अण्णा पाटील तसेच विनोद माहेश्वरी,श्रेयस महाशब्दे,सुदर्शन पवार,मंगेश पठाडे,यांचे सहकार्य लाभले असून नाशिककरांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जनस्थान व ११:३० @सलीम यांच्या वतीने करण्यात आले आहे.