कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या सह पाच मान्यवरांचा होणार सन्मान
नाशिक,दि,३० जानेवारी २०२४ – कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर २ वर्षानी देण्यात येणारा गोदावरी गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील सहा मान्यवरांना आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.
विवेक सावंत (ज्ञान),डॉ.सुचेता भिडे -चापेकर (नृत्य),सुनंदन लेले (क्रीडा),शामसुदीन तांबोळी (लोकसेवा ),आशुतोष गोवारीकर (चित्रपट),प्रमोद तांबोळी यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह ,सन्मानपत्र व २१ हजार रूपये रोख असे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण दि.१० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता गुरूदक्षिणा सभागृह कॉलेज रोड येथे होणार आहे अशी माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे ऍड विलास लोणारी, लोकेश शेवडे, ऍड अजय निकम,गुरुमित बग्गा हे उपस्थित होते,