मेनरोडच्या गणपती मंदिरात १० ते १४ फेब्रुवारी माघी गणेश जन्मोत्सव

0

नाशिक,दि,८ फेब्रुवारी २०२४ –मेनरोड येथील श्री गणेश भक्त मंडळी ट्रस्टच्या गणपती मंदिरात १३३  वा माघी गणेश जन्मोत्सव दि. १०ते १४ फेब्रुवारी वारी दरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत विशेष संगीत समारोहाचे आयोजन केले आहे.

उत्सवाची सुरुवात शनिवार , दि. १० फेब्रुवारी  रोजी  रात्री ९.३० वा मंगलोर येथील प्रसिद्ध बासरीवादक पं.  किरण हेगडे यांच्या वादनाने होईल .त्यांना  सुजीत काळे तबला साथ करतील.

रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सायं  ७ वा.   वे. शा. सं .पं. प्रभाकर श्रीकृष्णशास्त्री गोडशे, स्मार्त चुडामणी पं . शांताराम शास्त्री भानोसे  आणि ब्रह्मवृंद वेदोक्त मंत्रजागर करतील .

सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी  रात्री ९ ३० वा श्री गणेश भक्त संगीत सेवा श्री चरणी रुजू होईल.

मंगळवार , दि. १३ फेब्रुवारी रोजी  सकाळी ११ वा  ह  .भ.प. श्रीकृष्णबुवा शिखरे यांचे श्रीगणेश जन्माचे कीर्तन होईल आणि त्यानंतर  दुपारी १२ ३० वा श्री जन्मसोहळा  साजरा केला जाईल.

उत्सवाची सांगता बुधवार  दि  १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ३० वा  नाशिकचे युवा गायक  सागर कुलकर्णी यांच्या गायनाने होईल. त्यांना संगीत कुलकर्णी (तबला) आणि अभिजित भाटजिरे (संवादिनी) साथ करतील.

संपूर्ण उत्सव हा सर्वांसाठी खुला असून नाशिककर भाविक आणि संगीत प्रेमींनी कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.