अजित पवारांना मोठा धक्का ? शरद पवार गटात इनकमिंग जोरात

0

मुंबई,दि. ५ ऑक्टोबर २०२४ –लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसतेय.लोकसभा निवडणुकीतल्या शरद पवारांच्या स्ट्राईक रेटची आजही चर्चा होते. लोकसभेत १० पैकी ८ उमेदवार निवडून आणत पवारांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. एकहाती महाराष्ट्र पिंजून काढत पवारांनी लोकसभेला वारं फिरवलं होतं. आता विधानसभेतही शरद पवार आपला करिष्मा दाखवतील अशी चर्चा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसतेय.

शरद पवारांची साथ सोडलेले राष्ट्रवादीचे अनेक मंत्रीही तुतारी फुंकण्याची इच्छा मनी बाळगून आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कमळाची साथ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय. शुक्रवारी हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता महायुतीतला आणखी काही नेते शरद पवार गटाच्या वाटेवर आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बडे नेते रामराजे नाईक निंबाळकर लवकरच घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची माहिती आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण जवळच्या खटके वस्ती इथं कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला. आज रात्री कार्यकर्ते म्हणतील तो निर्णय घेणार असल्याचं रामराजे यांनी म्हटलं आहे. नुकतंच अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी दीपक चव्हाण यांना जाहीर केली होती. त्यामुळे रामाजे नाईक निंबाळकर नाराज आहेत.

 

Dhanashree Adhe (Singer)
धनश्री आढे (गायिका)

आजचा रंग – राखाडी
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

 

उद्याचा रंग – नारंगी

Pallavi Patil
पल्लवी पाटील (अभिनेत्री )

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!