सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक :१ तोळ्यासाठी सोन्याने १ लाखाचा टप्पा ओलांडला

1

मुंबई,दि,२१ एप्रिल २०२५ – (Today’s Gold Price) सोन्याच्या दरात सुरू असलेली तेजी कायम असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून दररोज नवनवीन उच्चांकी दर गाठत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षयतृतीयेला सोन्याचा दर १ लाखाच्या वर जाईल असा अंदाज असतांनाच आज सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. आज GST धरून सोन्याच्या दराने लाखाचा आकडा पार केला आहे. आता १ तोळ्यासाठी ९९,२८०.00 रुपये मोजावे लागणार आहेत.

येत्या काही दिवसांत हे दर एक लाखांचा टप्पा सहज पार करतील, असा अंदाज सोने व्यावसायिकांनी व्यक्त केला होता. अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेत दिसून येत आहे. चीनने गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत केवळ पंधरा दिवसांत भरघोस प्रमाणात सोने खरेदी केले आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या स्थितीचा थेट परिणाम भारतातील, विशेषतः जळगावसारख्या सुवर्ण नगरीतील दरांवर झाला आहे.

जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस $३,४००.८६ वर पोहोचला आहे. कमकुवत अमेरिकन डॉलर आणि जागतिक व्यापार चिंतांमुळे सोन्याच्या किमती नवीन उच्चांक गाठत आहेत. चांदीच्या किमतीतही ६१९ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा वायदा भाव ६१९ रुपयांनी वाढून प्रति किलो ९५,६५६ रुपये झाला. मे महिन्यातील डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ६१९ रुपयांनी वाढला असून जागतिक बाजारात चांदी ०.७२ टक्क्यांनी वाढून $३२.७९ प्रति औंसवर पोहोचली आहे. जागतिक तणाव आणि टॅरिफ वॉरमुळे सोने आणि चांदीच्या किमती वाढत आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] Samaj News धुळे जिल्ह्यात सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे एक ऐतिहासिक पाऊल […]

Don`t copy text!