नाशिक | दिनांक ,२ मे २०२५ – Power supply interruption Nashik -नाशिकमध्ये तापमानाचा पारा चढलेला असतानाच शहरातील काही भागांना शनिवारी (३ मे २०२५) वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती महावितरणने दिला आहे. सध्या शहराचे कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान असून, प्रचंड उकाड्यामुळे नागरिक आधीच त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर होणारा वीजपुरवठा खंडित होणे म्हणजे नागरीकांना आणखी एक ताण सहन करावा लागणार आहे.
🔧 वीजपुरवठा बंद राहण्याचे कारण:
द्वारका उपविभागातील इंदिरानगर कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रामध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ केली जाणार आहे. यासाठी ३३ केव्ही सिटी लाईन, ११ केव्ही पीटी आणि ३३ केव्ही कंट्रोल पॅनल यांची अदलाबदल करण्यात येणार आहे.
⏰ वीजपुरवठा बंद राहणारी वेळ:
📅 शनिवार, ३ मे २०२५
🕖 सकाळी ७:०० ते १२:०० वाजेपर्यंत
📍 वीजपुरवठा बंद राहणारे भाग:(Power supply interruption Nashik)
इंदिरानगर
सुचिता नगर
दिपाली नगर
भारत नगर
खोडे नगर आणि परिसर
📍या परिसरात देखील वीज पुरवठा बंद राहणार
तसेच दिनांक ३ मे शनिवार रोजी, ३३/११केव्ही शालिमार उपकेंद्रातील ११ केव्ही राजे बहादूर वाहिनीवरील विद्युत पुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत बंद राहील. यामध्ये एम जी रोड ,मेन रोड, चित्र मंदिर राजे बहादूर लेन, नेहरू गार्डन परिसर ,धुमाळ पॉईंट , रेडक्रॉस ,घनकर लेन सदर परिसर बंद राहील. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.
📢 महावितरणचे आवाहन:
महावितरणने नागरिकांना पूर्वसूचना देत आवश्यक तयारी करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही काळासाठी अडचण निर्माण होऊ शकते, परंतु सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगण्यात आले आहे.