मुंबई, २९ मे २०२५ – Sayyara teaser release date यशराज फिल्म्स (YRF) पुन्हा एकदा प्रेमकथांच्या दुनियेत नवा अध्याय लिहिण्यास सज्ज आहे. ‘सैयारा’ या आगामी चित्रपटाचा पहिला टीझर ३० मे, शुक्रवार रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांच्या उत्कंठेला नवीन उधाण येणार आहे.
मोहित सूरीच्या दिग्दर्शनाखाली नवा सिनेप्रवास
‘सैयारा’चे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केलं आहे, जे ‘आशिकी 2’, ‘एक विलन’ सारख्या हिट प्रेमकथांसाठी ओळखले जातात. त्यांच्या भावनिक आणि संगीतप्रधान शैलीत हा चित्रपट एक वेगळा अनुभव देईल, अशीच अपेक्षा आहे.
आहान पांडे यांचे बॉलिवूड पदार्पण
या चित्रपटातून चंकी पांडे यांचा मुलगा आहान पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यांच्या समवेत अनीत पड्डा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. अनीतने पूर्वी ‘Big Girls Don’t Cry’ या वेब सिरीजमधून मोठी लोकप्रियता मिळवली होती.
अक्षय विधानी यांची निर्मिती
या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी केली आहे. ‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, टीझर रिलीजनंतर(Sayyara teaser release date) याची प्रचार मोहिम मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे.