समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा उद्यापासून खुला –मुंबई-नागपूर आता केवळ ८ तासांवर!
नाशिक ते मुंबई आता फक्त २.५ तासात:किती असणार टोलचा दर
📍 नाशिक | दि. ४ जून २०२५- Samruddhi Mahamarg Inauguration राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे (७६ कि.मी.) टप्पा उद्या,५ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंप्रीसदो येथे होणार आहे.यानंतर या १० किमीमध्ये ७.८ किमीचा प्रवास ते बोगद्यातून करणार आहेत. विशेष म्हणजे याच टप्प्यात आलेला अत्यंत उंच म्हणजे ९० मीटर उंचीचा पूल आहे.त्याचीही ते पाहणी करतील आणि त्यावरून प्रवास करतील. त्यानंतर पुन्हा पिंप्रीसदो येथे परत येतील. तेथे पत्रकारांशी संवाद साधतील. नंतर लगेचच हेलिकॉप्टरने ते परतीचा प्रवास करतील.
🔧 प्रकल्पाचे वैशिष्ट्ये (Samruddhi Mahamarg Inauguration)
हा ७६ कि.मी. टप्पा ₹१,१८२ कोटी खर्चून बांधण्यात आला आहे.
बोगद्याची लांबी: ७.८ कि.मी.
उंच पूल: ९० मीटर
३५ मीटर रुंद,६ लेनचा ड्युअल टनेल रस्ता
संपूर्ण महामार्गाची लांबी: ७०१ कि.मी.
रस्ता डिझाइन: १५० किमी/ता गतीने प्रवासासाठी
एकूण उड्डाणपूल: ६५, इंटरचेंज: २४
कसारा घाटात ८ किमीचे जुळे बोगदे
🚗 प्रवासात मोठा बदल
नागपूर ते मुंबईचा प्रवास १६ तासांऐवजी ८ तासात
नाशिक ते मुंबई आता फक्त २.५ तासात
इगतपुरी ते आमणे दरम्यानचा प्रवास आता फक्त ३०-४० मिनिटात
💰 टोल दर (प्रति कि.मी.)
हलकी वाहने: ₹२.०६
हलकी व्यापारी वाहने: ₹३.३२
२ अॅक्सल ट्रक: ₹६.९७
३ अॅक्सल ट्रक: ₹७.६०
बांधकाम मशीनरी: ₹१०.९३
७अॅक्सल ट्रक: ₹१३.३०
🚧 मुंबईकरांना अजून थोडी प्रतीक्षा
एकूण एक्सप्रेसवेचे अंतिम टोक अमाणे येथे असले तरी,वडपे इंटरचेंजचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी १ वर्ष लागेल.
तोपर्यंत मुंबई-नाशिक महामार्गावर शांग्रीला रिसॉर्टजवळून तात्पुरता मार्ग वापरण्यात येणार आहे.
🎤 उद्घाटन समारंभास प्रमुख नेत्यांची उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री अजित पवार
उद्या समारंभात सहभागी होणार असून,राज्यासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.
[…] […]