मुंबई, दि. १२ जून २०२५ — Fadnavis Raj Meeting महाराष्ट्राच्या राजकारणात आज सकाळपासून मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील ताज लँड्स एन्ड हॉटेल मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली आहे. सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेने ठाकरे बंधूंमधील संभाव्य युतीवर नवेच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
ही भेट निवडणुकांआधी राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग असल्याचं तज्ज्ञांचं मत असून, भाजपसाठी ही “प्रेशर टॅक्टिक्स” ठरू शकते. तसेच, मनसेला देखील या भेटीचा मोठा राजकीय फायदा मिळू शकतो.
राज ठाकरे सकाळी ९.४० वाजता हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री फडणवीस ताफ्यासह पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांमध्ये नवा पेच निर्माण करणारी आहे.
स्थानिक निवडणुका आणि युतीचे गणित(Fadnavis Raj Meeting)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येणाऱ्या काही महिन्यांत महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई महानगरपालिका निवडणूक ही सर्वात निर्णायक मानली जाते. ही निवडणूक फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर उद्धव ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
गेल्या काही महिन्यांत उद्धव ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं असून, मनसेसोबतची युती ही त्यांच्यासाठी नवसंजीवनी ठरू शकते. दुसरीकडे, राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आधीपासूनच ओळखले जातात. त्यामुळे, आजच्या बैठकीमुळे राज ठाकरे पुन्हा महायुतीच्या जवळ जाणार का, यावर चर्चा रंगली आहे.
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार?
मनसे आणि उद्धव गट यांच्यात खालच्या पातळीवर संवाद सुरु झाल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविषयी सकारात्मक भावना वाढत आहेत. मात्र, आजच्या राज ठाकरे-फडणवीस भेटीमुळे “ठाकरे बंधू पुन्हा एकत्र?” या प्रश्नावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरे गट हे महायुतीच्या विरोधात ठाम उभा आहे. अशात राज ठाकरे जर महायुतीच्या गोटात अधिकृतपणे गेले, तर ठाकरे बंधूंमधील युतीची शक्यता अल्प होण्याची शक्यता आहे.
पुढचं चित्र काय?
आजची ही भेट राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाची आणि संकेतपूर्ण मानली जात आहे. उद्धव ठाकरे गट यावर कसा प्रतिसाद देतो, यावरच पुढचं राजकारण अवलंबून असेल. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार की फुटणार, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.