गाडी नंबर १७६० चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!
विनोद,रहस्य आणि पैसा यांचा थरारक खेळ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, दि. १९ मे २०२५ – Marathi thriller movie मराठी प्रेक्षकांसाठी एक भन्नाट सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, सध्या तो सोशल मिडीयावर चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. ‘गाडी नंबर १७६०’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर हा विनोदी आणि रहस्यमय कथानकाचा उत्तम मिलाफ दाखवतो. योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित आणि तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात पैसा, लालसा आणि एक काळी बॅग याभोवती फिरणारी कथा उलगडते.
चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारखे कसलेले कलाकार आहेत. ट्रेलरमध्ये दिसते की, अनेक पात्रं एका रहस्यमय बॅगेच्या मागे लागलेली आहेत. पण नेमकी बॅग कुणाची? ‘गाडी नंबर १७६०’ आणि या सगळ्याचा संबंध काय? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ४ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
दिग्दर्शक योगीराज गायकवाड सांगतात, “हा चित्रपट मानवी लालसेचं आणि गोंधळलेल्या नैतिकतेचं एक हास्यविनोदी प्रतिबिंब आहे. आम्ही प्रत्येक पात्राचं वेगळं मनोविज्ञान दाखवलं आहे. एकाच गोष्टीसाठी वेगवेगळ्या प्रवृत्ती कशा धावत आहेत, हे या सिनेमातून दिसेल.”
निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, “‘गाडी नंबर १७६०'(Marathi thriller movie) हा केवळ एक मनोरंजन करणारा चित्रपट नाही, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करणारी, विचार करायला लावणारी कथा घेऊन येतो. त्यात रहस्यही आहे आणि हसवणूकही!”हा चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
[…] गाडी नंबर १७६० चा धमाकेदार ट्रेलर प्र… […]