आजचे राशिभविष्य सोमवार,१ जून २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अधिक ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा / दुपारी ४.३८ नंतर द्वितीया. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२
⏰ राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
🌙 चंद्र नक्षत्र – ज्येष्ठ / संध्याकाळी ७.०९ नंतर मूळ.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक / संध्याकाळी ७.०९ नंतर धनु. (नक्षत्र गंडांत शांती)
आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे.

🪔 राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- आज दिवसाच्या पूर्वार्धात काही अडथळे जाणवतील. संध्याकाळनंतर परिस्थिती अनुकूल होईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना यशस्वी होतील.

वृषभ:- कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. कामाच्या ठिकाणी संयमाने वागणे आवश्यक आहे. संध्याकाळनंतर लाभदायक बातमी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन:- चंद्र-बुध योगामुळे विचारांची गती वाढेल. लेखन, शिक्षण आणि व्यापार क्षेत्रात यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. संध्याकाळनंतर मन प्रसन्न राहील.

कर्क:- आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्या. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. मालमत्तेसंबंधी कामे पुढे सरकतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह:- पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळनंतर शुभ कार्यासाठी वेळ अनुकूल आहे.

कन्या:- खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळनंतर आर्थिक लाभाची संधी मिळेल.

तुळ:– मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींचा सहवास लाभदायक राहील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

वृश्चिक:- चंद्र राशीत असल्याने संवेदनशीलता वाढेल. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. संध्याकाळनंतर भाग्याची साथ मिळेल.

धनु:- संध्याकाळनंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला काळ आहे. प्रवास लाभदायक ठरेल.

मकर:- शत्रूंवर मात कराल. कोर्ट-कचेरीच्या कामात अनुकूलता राहील. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. गुप्त लाभ संभवतात. आरोग्याबाबत जागरूक राहा.

कुंभ:- भाग्योदयाचे संकेत मिळतील. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षार्थींना यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.

मीन:- उद्योग-व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संततीसंबंधी शुभ वार्ता मिळू शकते. संध्याकाळनंतर विशेष लाभ संभवतात.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!