ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
आषाढ शुक्ल त्रयोदशी / (दुपारी ४.१५ नंतर) चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू.पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – मूळ / (सकाळी १०.२९ नंतर) पूर्वाषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
आज वर्ज्य दिवस आहे.
रवी लाभ हर्षल.
रवी त्रिकोण नेपच्यून.
चंद्र प्रतियुती बुध.
चंद्र केंद्र शनी.
राशिभविष्य -(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-भाग्याची साथ लाभेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रवासाचे नियोजन यशस्वी होईल. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.
वृषभ:-आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळा. संयम आणि नियोजनामुळे यश मिळेल.
मिथुन:-चंद्र-बुध प्रतियुतीमुळे बोलताना गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. महत्त्वाच्या चर्चा विचारपूर्वक करा. विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल.
कर्क:-कामाचा ताण वाढू शकतो, पण वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नियमितपणा आणि शिस्त ठेवल्यास कामे पूर्ण होतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
सिंह:-संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. सर्जनशील क्षेत्रात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आत्मविश्वास कायम राहील.
कन्या:-घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. मानसिक समाधान लाभेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.
तुळ:-पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. लहान प्रवासाचे योग संभवतात.
वृश्चिक:-आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतील. गुंतवणूक विचारपूर्वक करा.
धनु:-राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. रवी-हर्षल व रवी-नेपच्यून शुभ योगामुळे नवीन कल्पनांना यश मिळेल. चंद्र-शनी केंद्र योगामुळे संयम ठेवल्यास मोठे यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
मकर:-खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. जुनी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. संयम लाभदायक ठरेल.
कुंभ:-मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल.
मीन:-व्यवसाय व नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कल्पकतेचा योग्य उपयोग केल्यास विशेष यश मिळेल. मानसिक स्थैर्य राखा.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)




