
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक शुक्ल तृतीया / संध्याकाळी ६.१० नंतर चतुर्थी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.चंद्र नक्षत्र – ज्येष्ठ / दुपारी २.१९ नंतर मूळ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक / दुपारी २.१९ नंतर धनु.
विशेष – नक्षत्र गंडांत.
ग्रहयोग – चंद्र त्रिकोण मंगळ, चंद्र त्रिकोण गुरू, चंद्र लाभ शुक्र, चंद्र केंद्र नेपच्यून.
आजचा दिवस – दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे. दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे करताना सावधगिरी बाळगावी. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. चंद्र त्रिकोण मंगळ आणि चंद्र त्रिकोण गुरू योगामुळे कामात उत्साह, आत्मविश्वास आणि प्रगतीच्या संधी मिळतील. चंद्र लाभ शुक्र योगामुळे आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सौख्य लाभण्याची शक्यता आहे. मात्र, चंद्र केंद्र नेपच्यून योगामुळे निर्णय घेताना संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.
राशिभविष्य -(Marathi Rashi Bhavishya)
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होतील. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. नवीन करार करण्यासाठी दुपारनंतरचा काळ अनुकूल आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) बौद्धिक आणि कलात्मक कामात विशेष यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेच्या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. दुपारनंतर रखडलेली कामे मार्गी लागतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र त्रिकोण मंगळ आणि गुरू योगामुळे महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. मात्र, नक्षत्र गंडांत असल्याने दुपारी २.१९ पूर्वी महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दुपारी २.१९ नंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. महत्त्वाची कामे दुपारनंतर पूर्ण होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) मित्रमंडळींकडून उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. दुपारनंतर रखडलेली कामे मार्गी लागतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) भाग्याची उत्तम साथ लाभेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
