आजचे राशिभविष्य सोमवार,१६ नोव्हेंबर २०२६ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Today Horoscope)
कार्तिक शुक्ल सप्तमी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
नक्षत्र – श्रवण.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.
करण – बव आणि बालव.
ग्रहयोग – चंद्र लाभ शनी.
आज शुभ दिवस आहे. चंद्र लाभ शनी योगामुळे कामात स्थिरता, संयम आणि नियोजनातून यश मिळण्यास अनुकूल ग्रहमान राहील.

राशिभविष्य(Today Horoscope)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक व्यवहारात लाभ होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) भाग्याची चांगली साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. वारसा हक्काच्या बाबतीत काही चर्चा होऊ शकते. जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस आहे.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) नोकरी-व्यवसायातील कामाचा व्याप वाढेल. स्पर्धकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी. कामातील अडचणी दूर होतील. दैनंदिन कामात शिस्त आणि नियोजन ठेवा.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल. कला आणि सर्जनशील क्षेत्रात प्रगती होईल. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. वाहन आणि घरासंबंधी व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) भावंडांचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्याचे योग आहेत. आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस आहे.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. चंद्र लाभ शनी योगामुळे संयम आणि नियोजनातून महत्त्वाची कामे यशस्वी होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. धार्मिक कार्यात मन रमवाल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!