ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस, *अंगारकी चतुर्थी* आहे.” (मुंबई चंद्रोदय रात्री ९.५९)
चंद्रनक्षत्र – शततारका (सकाळी १०.१४ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल रवी, बुध सुख प्रधान करतील. दीर्घकालीन लाभाचे करार होतील. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वैर निर्माण होईल. शांतता राखा. अनुकूल रवी सौख्य देईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामानिमित्त भ्रमंती करावी लागेल. मन अस्वस्थ राहील. अनुकूल बुध अचानक धनलाभ देईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान संमिश्र आहे. मन शांत ठेवा. फार काळजीचे कारण नाही.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी वाद होऊ शकतात. गैरसमज होऊ देऊ नका. घरात शांतता राखा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) महत्वाची कामे आज नकोत. कामात अडथळे येतील. नियोजन बिघडेल. मन शांत ठेवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) वैरभाव निर्माण होऊ देऊ नका. कामात अडथळे येतील. अनुकूल शनी प्रगतीच्या वाटेने नेणार आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मन आनंदी राहील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्चात वाढ होते आहे. आर्थिक नियोजन काटेकोर करा. अनामिक भीती दाटून येईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन अस्वस्थ राहील. उपासना केल्यास चांगले फळ मिळेल. अध्यात्मिक लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. अनुकूल शनी अडचणी दूर करेन.
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)