आयमा इंडेक्स २०२२ : अखेरच्या दिवशी गर्दीचा उच्चांक,दीड लाखाचा टप्पा पार

नाशकात आणखी ११६० कोटींची गुंतवणूक आणण्यात आयमाला यश - धनंजय बेळे

0

नाशिक-डोंगरे वसतिगृह मैदानावर गेल्या ५ दिवसापासून आयोजित आयमा इंडेक्स २०२२ प्रदर्शनाचे सूप काल वाजले.कडाक्याचे ऊन असतांनाही प्रदर्शन बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.सोमवारी गर्दीचा उच्चांक झाला.एक लाख लोक प्रदर्शन बघण्यास येतील अशा अंदाज होता.मात्र प्रत्यक्षात हा आकडा दीड लाखाच्या पुढे गेला त्यामुळे आयोजकांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसले.

नामांकित कंपन्यांच्या अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधींनी B2B अंतर्गत सर्व स्टॉल्सना भेटी देऊन उद्योजकांच्या उत्पादनांची माहिती जाणून घेऊन त्यांच्या मालास उठाव कसा मिळेल याबाबतची रणनिती त्यांना सांगितली आणि आवश्यकता भासल्यास त्यांची उत्पादने खरेदी करण्याचे दिलेले अभिवचन हे या प्रदर्शनाचे खरे फलित म्हणावे लागेल.शेवटच्या दिवशी प्रदर्शन बघण्यासाठी ७५ हजारांहून अधिक लोकांनी गर्दी केली.विशेष म्हणजे विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी गटागटाने आल्याचे चित्र जाणवले.पदाधिकाऱ्यांना वाटून दिलेल्या कामाचे उत्कृष्ट वाटप झाल्याने आणि प्रत्येकाने मानापमामास फाटा देऊन आपापली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडल्याने प्रदर्शन यशस्वी होण्यास खूपच मदत झाली,असा दावा प्रदर्शनाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि आयमाचे विद्यमान अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सांगितले. तसेच कोरोना ओसरल्यानंतर ३६५ उद्योजकांनी धाडस करून आपापले स्टॉल्स लावल्याने त्यांचे मानावे तितके आभार थोडे आहे,असेही त्यांनी सांगितले.

प्रदर्शन यशस्वीत्यासाठी निखिल पांचाळ,सुदर्शन डोंगरे,राजेंद्र पानसरे,ललित बूब,गोविंद झा,योगिता आहेर,राजेंद्र कोठावदे,वरूण तलवार, जितेंद्र आहेर,प्रमोद वाघ, आर.एस नाईकवाडे,विनायक मोरे, दिलीप वाघ अविनाश मराठे जयदीप अलीम चंद्वानी हर्षद बेळे जगदीश पाटील,जयंत जोगळेकर,राहुल गांगुर्डे,देवेंद्र राणे,जयंत पगार,अविनाश बोडके,हर्षद ब्राह्मणकर,गौरव धारकर,विराज गडकरी,मेघा गुप्ता,हेमंत खोंड,रवींद्र झोपे,के.एन.पाटील,मनीष रावळ,सुमीत बजाज,नितेश नारायणन,सिद्धेश रायकर,सतीश कोठारी,आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे आदी उपस्थित होते

उद्योजकांमध्ये दांडगा उत्साह – आयमा इंडेक्स २०२२ औद्योगिक प्रदर्शन न भूतो न भविष्यती असे यशस्वी झाले.सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेली मोलाची साथ आणि ३२५ स्टॉल्सचे उद्दिष्ट असतानाही ३७५ स्टॉल्स उभारावे लागले यावरून उद्योजकांमध्ये किती दांडगा उत्साह होता याची प्रचिती येते.नाशिककरांनीही प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी करून उद्योजकांचा आनंद द्विगुणित केला ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे.

नाशकात आणखी ११६० कोटींची गुंतवणूक आणण्यात आयमाला यश – धनंजय बेळे
आयमा प्रदर्शनाचे चांगले फलित झाल्याचे निदर्शनास आले असून काल आणखी 1160 कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले अशी घोषणा समारोपाच्या कार्यक्रमात करण्यात आली.पहिल्याच दिवशी ८५० कोटी आणि आता आता ११६० कोटी म्हणजे जिल्ह्यात २०१० कोटींचे नवीन सहा प्रकल्प येतील आणि त्याद्वारे रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल,असे प्रदर्शन अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले..

काल ११६० कोटी रुपये गुंतवणुकीचे जे तीन सामंजस्य करार झाले त्यामध्ये ब्राईटसिनो प्रा. लि.८५० कोटी,जिंदाल सा २५०कोटी आणि ज्योस्टिक(जर्मन कोलॅब्रेशन) 60 कोटी यांचा समावेश आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!