घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीचा नवा रेकॉर्ड

0

नवी दिल्ली – वाढलेली महागाई कमी करा असं हा सामान्य माणूस सांगत असला तरी त्यावर केंद्र सरकार इलाज करू शकलेली नाहीये.पेट्रोल-डिझेल, खाण्यापिण्याच्या, वापरायच्या अनेक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. असं असताना आता सर्वसामान्यांना आणखी एक फटका बसणार आहे.सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता १४.२ किलोच्या घरात वापरला जाणारा सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. आजपासून दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपयांवर पोहोचली आहे.

दरम्यान १ मे पासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती १०० रुपयांपेक्षा जास्त वाढल्या होत्या. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या नाहीत. यापूर्वी एप्रिलमध्येही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. हे दर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी वाढवण्यात आले होते. यामुळे दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत २२५३ वरून २३५५.५० रुपये झाली आहे.

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावानंतर आता हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था बाहेर येत आहे. यासोबतच जगभरात उर्जेची मागणी वाढते आहे. परंतु मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नसल्याने गॅसच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.असे जाणकारांचे च मत आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. यासाठी तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करावं लागेल. दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जातात.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!