नरेडकोच्या ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शनाचा आज शुभारंभ

बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉ.निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

0

नाशिक,२२ डिसेंबर २०२२ – नरेडकोच्या ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शनाचा आज (२२ डिसेंबर) पासून शुभारंभ होत आहे.सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवीदराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)तर्फे २२ ते २५  डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो”  प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन नरेडकोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते होणार असून   नरेडको नॅशनल प्रेसिडेंट राजन बांदलकर यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.अशी माहिती नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड आणि समन्वयक जयेश ठक्कर यांनी दिली.

उद्घाटन सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमाताई हिरे,विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी गंगाधरन.डी ,मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे,जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी असिमा मित्तल,आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड या उपस्थित राहणार आहेत.

आपल्या स्वप्नातील घर व्हावे  त्यांच्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून नाशिक, मुंबईसह नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे त्यांना उपलब्ध होईल, अपार्टमेंट्स, शॉप्स,ऑफिसेस यासाठी स्मार्ट सिटी नाशिक मध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे.सर्वांना परवडणारी घरे या प्रदर्शनात असणार असून १५ लाखांपासून ते ४ कोटी रुपया पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.या प्रदर्शनामुळे रिअल इस्टेट आणि ग्राहक दोघांनाही फायदा होणार आहे.

“लिव्ह – इन्व्हेस्ट – ग्रो” हि नरेडकोची संकल्पना आहे. हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून  मुंबईसह नाशकातील  नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे सगळे प्रकल्प एकाच छताखाली ग्राहकांना नरेडकोच्या या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. “बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना इथे विशेष सवलती असतील, बँकिंग पार्टनर्स देखील ग्राहकांना विशेष सवलत देणार आहेत. स्पॉट बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक चांदीचं नाणं या ठिकाणी भेट मिळणार आहे जितके लोक एक्झिबिशन बघायला येतील त्यापैकी एका भाग्यवंताला दररोज दर तासाला तेजस्वी ज्वेलर्स तर्फ़े लकी ड्रॉ द्वारे  चांदीचं नाणं मिळणार आहे”. प्रॉपर्टी व्यतिरिक्त याठिकाणी बांधकाम मटेरियल, इंटिरियर मटेरियलचे स्टॉल असणार आहे. विविध बँकांच्या स्कीम सवलती सुविधा इथे ग्राहकांना एकाचवेळी समजतील.प्रदर्शनात नाशिक मुंबईतील नामवंत बिल्डर्सचे स्टॉल्स असून  बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साहित्ये यांये स्टॉल्सही येथे असणार आहेत.

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे दीपक चंदे असून सह प्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो,केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून  एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

डोंगरे वसतिगृह मैदानावर २२ ते २५ डिसेंबर पासून नागरिकांना खुले असून जास्तीतजास्त नागरीकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन नरेडकोचे सचिव सुनील गवादे,सह सचिव शंतनू देशपांडे यांनी केले आहे.

” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ “यशस्वी होण्यासाठी अविनाश शिरोडे, पुरुषोत्तम देशपांडे,राजेंद्र बागड भाविक ठक्कर,अश्विन आव्हाड,  प्रशांत पाटील, नितीन पाटील, मयूर कपाटे, भूषण महाजन, श्रीहर्ष घुगे, प्रयत्नशील आहेत.

Naredco's grand "Homethon" Exhibition

 

नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शनात केंद्र सरकारचा रियल इस्टेट प्रकल्पात मदत करण्यासाठी उभारलेल्या स्वामी फंडाची होणार सहकार्य.: होमेथॉन प्रदर्शनाला भेट देण्यासाठी स्वामी फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी इरफान काझी उपस्थित राहून साधणार बांधकाम व्यवसायिकांशी संवाद …
होमेथॉन प्रदर्शन अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे कारण ‘स्वामी फंड ‘ हा केंद्र सरकारचा रियल इस्टेट प्रकल्पात मदत करण्यासाठी उभारण्यात आलेला असून त्याची यात मोठे सहकार्य लाभणार आहे. ग्रीन एक्झिबिशन हे या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य असून पर्यावरण दृष्ट्या यात काळजी घेण्यात येणार आहे.

सध्या भारतातील सुमारे ९० प्रकल्पासाठी स्वामी फंडामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व ग्राहकांना वेळेवर घरे मिळावी, यासाठी यासाठी हा फंड निर्माण करण्यात आला आहे. होमथॉन प्रदर्शनाला भेट देण्यासाठी स्वामी फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी इरफान काझी उपस्थित राहणार असून यावेळी बांधकाम व्यवसायिकांशी ते संवाद साधणार आहे.

स्वामी फंड बद्दल माहिती देताना नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड यांनी सांगितले की, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड डेट फंड म्हणून स्थापित केलेला सरकार समर्थित फंड आहे, तो २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आला होता. निधीच्या कमतरतेमुळे रखडलेल्या रेरा नोंदणीकृत परवडणाऱ्या आणि मध्यम-उत्पन्न गृह प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी स्वामी इन्व्हेस्टमेंट फंडाची स्थापना करण्यात आली. फंडाचे गुंतवणूक व्यवस्थापक हे SBICAP व्हेंचर्स आहेत, ही SBI कॅपिटल मार्केट्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. SBI कॅपिटल मार्केट्स ही स्टेट बँक ऑफ इंडियाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. भारत सरकारच्या वतीने निधीचे प्रायोजक वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आहेत.

रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) कायदा (RERA) हा संसदेने २०१६ मध्ये मंजूर केलेला कायदा आहे जो १ मे २०१७ पासून पूर्ण अंमलात आला.या कायद्याने रिअल इस्टेट क्षेत्राचे नियमन करण्यासाठी प्रत्येक राज्यात रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (RERA) ची स्थापना केली आणि विवादांचे जलद निराकरण करण्यासाठी एक निर्णय देणारी संस्था म्हणूनही काम केले. स्वामी फंडाचा उद्देश हा घर खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करून रिअल इस्टेटच्या विक्री किंवा खरेदीमध्ये कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणून रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यात मदत करते, असेही त्यांनी सांगितले.

निधीच्या कमतरतेमुळे रखडलेल्या, रेरा-नोंदणीकृत परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न श्रेणीतील गृहनिर्माण प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी स्वामी निधीची स्थापना करण्यात आली. स्वामी इन्व्हेस्टमेंट फंड हा सहाय्यक हा घरे बांधून पूर्ण झाल्यानंतर, या प्रकल्पांमध्ये बंद असलेले मोठे भांडवल दिले जाईल. हे बांधकाम कामगारांना रोजगार देईल आणि स्टील आणि सिमेंट सारख्या संबंधित उद्योगांना चालना देईल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.