
मुंबई – अल्पावधीत लोकप्रिय झालेली स्टार प्रवाह वरील मालिका ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील भावनिक वळण सध्या प्रत्येकाच्याच मनाला चुटपुट लावणारं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा २५ वर्षांचा संसार अखेरिस मोडला. घटस्फोटानंतर अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं. अरुंधतीला घर आणि आपली माणसं सोडताना ज्या वेदना झाल्या त्याच वेदना अनुभवताना प्रेक्षकांनाही अश्रू अनावर होत होते.
मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी देखिल एक भावनिक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.


