चारचाकी वाहनांमध्ये आता सहा एअरबॅग्स बसवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश

0

नवी दिल्ली – भारतातील लोकसंख्या वाढीबरोबरच रस्त्यावरील धावणाऱ्या गाडयांची संख्या हि मोठ्या प्रमाणात वाढत आहे.रस्त्यावर वाढलेल्या गाड्यांमुळे अनेक शहरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.विशेष म्हणजे चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातांच्या घटनाही रोज कानी पडत असून सगळ्यांसाठीच हा चिंतेचा विषय बनलाय.नागरीकांच्या सुरक्षततेसाठी केंद्रसरकार कडून एक पाऊल पुढे टाकण्यात आले असून यापुढे चारचाकी वाहनांच्या सर्व प्रकारच्या मॉडेल्समध्ये किमान सहा एअरबॅग्स देण्यात याव्याअसे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना दिले आहेत.

Union Minister Nitin Gadkari's directive to install six airbags in four-wheelers

भारतीय वाहन उत्पादक सोसायटीच्या कार्यकारी प्रमुखांच्या प्रतिनिधींची केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेत त्यांना ही महत्वाची सूचना केली.

भारतात केवळ १० लाखावर टॉप मॉडेल मधेच सहा एअरबॅग्स देण्यात येतात परंतु सर्वसामान्यना परवडणाऱ्या गाड्यांमध्ये केवळ दोनच एअरबॅग्स असतात. त्यापूर्वी काही वाहने अगदी एअरबॅग्स शिवाय दिली जात होती. परंतु भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व कारमध्ये आता ३१ ऑगस्ट, २०२१ पासून कमीतकमी दोन एअरबॅग असणे आवश्यक आहे, असा नियम करण्यात आला आहे. मात्र आता आता बेसिक कार मध्येही सहा एअरबॅग्स द्याव्या लागतील.त्यामुळे डॅशबोर्ड आणि इतर गोष्टींमध्ये बदल करावा लागेल, मात्र यामुळे वाहनाची १० ते १२ टक्क्यांनी किंमत वाढेल.असे बैठकीत झालेल्या चर्चेत समोर आले आहे.

आता गडकरींनीच हे निर्देश दिल्याने वाहन उत्पादक आता कामाला लागले आहेत. सर्व चारचाकी वाहनांमध्ये या एअरबॅग्स कशा उपलब्ध करून द्यायच्या ? त्यासाठी वाहनांची रचना कशी करायची ? यासाठी आता त्यांच्याकडून चाचपणी सुरु करण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.