मंदीला ब्रेक…. ! कि वादळापूर्वीची शांतता ?

विश्र्वानाथ बोदडे,नाशिक

0

विश्र्वानाथ बोदडे,नाशिक
88 88 280 555

सध्या भारतीय शेअर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला तर मुळातच आहेत परंतु बाजारा बाजारामध्ये मंदीला ब्रेक मिळाला की ही वादळा पूर्वीची शांतता आहे ? असे संभ्रमाचे वातावरण गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेले आहे याला मुख्य कारण म्हणजे बाजार आठवड्यातील काही दिवस तेजी दर्शवत आहेत तर काही दिवस नफा वसुली चे सत्र दाखवत आहेत मागील तीन दिवसांमध्ये बाजारामध्ये चांगल्या प्रकारे खरीदी बघायला मिळाली याचा आधार म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजार आहेतच परंतु सध्या चांगल्या प्रतीच्या समभागांमध्ये चांगल्या प्रकारे खरेदी होताना दिसत आहे सहाजिकच ही खरेदी लांब आवडीची असते.

आज सकाळी भारतीय शेअर बाजार जागतिक बाजारांच्या संकेतांच्या आधारे चांगल्या प्रकारे सकारात्मक उघडले परंतु काही कालावधीसाठी बाजार आहे त्याच रेंजमध्ये खेळताना दिसले परंतु दुपारच्या सत्रात बाजारांमध्ये अजून खरेदी दिसली व बाजाराने चांगला स्तर घातला होता परंतु वरच्या स्तरावर काही प्रमाणात विक्री आली त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 384 अंकांनी वधारून 57315 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 117 अंकांनी वधारून 17072 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग शेअर मिळून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक 161 अंकांनी वधारून 35191 या पातळीवर बंद झाला.

बाजारामध्ये आजच्या सत्रात प्रामुख्याने ऑइल अँड गॅस आणि काही ठराविक समभागांमध्ये चांगल्याप्रकारे खरेदी दिसली परंतु बाजारामध्ये सर्वात मोठी भीती म्हणजे नवीन येणारा विषाणू व महागाई हे मोठे चॅलेंज आहे त्याच बरोबर वर्षाच्या शेवटचा महिना असल्यामुळे गुंतवणूकदार सावध पवित्र्यात असल्याचे दिसत आहेत सकारात्मक गोष्ट म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती या काही प्रमाणात स्थिरावलेल्या दिसत आहेत.

सध्या बाजारामध्ये स्मॉल कॅप व मिडकॅप या संबंधांमध्ये विशिष्ट प्रकारची हलचल बघायला मिळत आहेत परंतु गुंतवणूकदारांनी अफवेच्या आधारावर गुंतवणूक न करता अभ्यास व फंडामेंटल बघून गुंतवणूक करावी असे बाजारातील तज्ञ आपले मत नोंदवताना दिसत आहेत.

कमोडिटी बाजाराचा विचार केला तर सध्या ज्या प्रमाणे शेअर बाजार चढ उतार दाखवत आहेत त्याप्रमाणे सोने आणि चांदी हि जरी सुरक्षित गुंतवणूक मानली जात असली तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर उच्चार बघायला मिळत नाही आहेत.

NIFTY १७०७२ + ११७
SENSEX ५७३१५ + ३८४
BANK NIFTY ३५१९१ + १६१

आज निफ्टी वधारलेला शेअर्स

POWERGRID २०९ + ४%
IOC ११२ + ३%
ONGC १४१ + ३%
ITC २१७ + ३%
BAJFINANCE ६९१८ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

DIVIS LAB ४४८३ – २%
JSW STEEL ६५० – २%
BHARTIARTL ६७९ – १%
SUNPHARMA ७९१ – १%
ULTRACEMCO ७३२२ – १%

यु एस डी आई एन आर $ ७५.२९००
सोने १० ग्रॅम ४८०५०.००
चांदी १ किलो ६२५००.००
क्रूड ऑईल ५५०५.००

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.