डॉ राहुल रमेश चौधरी
आज काल प्रत्येक घरात उच्चरक्तदाब (hypertension) हा शब्द ऎकायला मिळतो.बहुतांश घरात कोणाला न कोणाला तरी हा सुप्त स्वरुपात शरीराला हळू हळू मारणारा आजार असतोच व त्याकरीता वर्षानुवर्षे गोळ्या घेत असताना आपण पाहिले आहे.आजपर्यतच्या अनेक वर्षात आयुर्वेद शास्त्राच्या प्रॅक्टीस मध्ये असे पाहण्यात निदर्शनास आहे की प्रत्येक रुग्ण हा कायमस्वरूपी उच्च रक्तदाबाचा असतोच असे नाही.फक्त रक्तदाब मापकात आकडे वाढले कि रक्तदाबाचा आजार आहे असे कसे म्हणता येईल?
मानवी शरीरात थायरॉईड ,मधुमेह,कोलेस्टॆरॉल,उच्च रक्तदाब आदी ज्या गोष्टी वाढतात व त्याला ती ती नावे दिली जातात. गोळी घेवून आजार गेला असे म्हणता येत नाही.आजार गेला असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा या पातळी वाढण्याचे मूळ कारण नष्ट होईल आणि आयुर्वेद असो ऍलोपॅथी वा तत्सम शास्त्राची उपचार गरज राहणार नाही,रोजच्या आहार विहाराचे नियमीत नियम पाळल्यास आटोक्यात राहील तेव्हा.प्रत्येक वेळी उच्च रक्तदाब निदान असेलच असे नाही याचे वेगवेगळे कारणे असू शकतात.याच आधारावर उच्च रक्तदाब कारणानुसार बरा करता येवू शकतो.अश्या या उच्च रक्तदाब या आजाराविषयी आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून बघूयात.
१.उच्च रक्तदाब म्हणजे काय ? –
सामान्य भाषेत रक्तदाब म्हणजे शरीरातील रक्ताचा वाढलेला दाब,हा दाब विविध कारणाने वाढू शकतो.वेगवेगळ्या कारणानुसार वेगवेगळे निदान असते.प्रत्येक वेळेला फक्त रक्तदाब वाढला म्हणजे आयुष्यभराची गोळी असे गणित चूकच.
२.उच्च रक्तदाबाची कारणे ?
अ) वारंवार लघवी,शौचास जावे वाटत असूनही न जाणे त्यास रोखणे,ढेकर-शिंक-अश्रू-शुक्रस्त्राव अडवून धरणे
ब) अजीर्ण,खाल्लेले न पचणे
क) विरुध्द अन्न खाणे ड)एकावर एक असे वारंवार खाणे
ई) जे शरीराला सहन होत नाही असे सहन होत नसताना खाणे
इ) शरीरावर विषाचा परिणाम होणे ते विष विरुध्दान्न स्वरूपात का असेना
उ) सतत गरम,तीक्ष्ण,तिखट ,खारट ,तूरट,कडू,आंबट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे
ऊ) प्रमाणापेक्षा सतत जास्त पाणी पिणे
ए) अनेक प्रकारची आधुनिक औषधांचा दूष्परिणाम स्वरुपात
ऎ) दुसऱ्या आजारांचे लक्षणरूप उदा.तीव्र अम्लपित्त,थायरॉईड,मानसिक ताण तणाव,मद्याचा अंमल अति प्रमाणात असणे,स्टेरॉईड्स चे अत्यधिक सेवन
ओ) वय,लिंग,शरीर यष्टी,जेवण,झोप,भावना,शरीराची ठेवण,व्यायाम याचे एकमेकांशी असणारे असंतुलन
औ) अतिप्रमाणात शुक्रक्षय,अति उपवास,रात्री जागरण,दिवसा झोपणे,व्यसनाधीनता-धूम्रपान,मद्यसेवन अं)वारंवार जंतांचा त्रास होणे
अ:) अतिसाहस,संताप,राग,द्वेष या घटकांची तीव्रता असणे
३.लक्षणॆ (Symptoms of high blood pressure)
अ. छातीत दुखणे
ब.अचानक चक्कर येणे
क.तीव्र डोके दुखणे अथवा सतत अंधूक अधूक डोके दुखणे
ड.डोळ्यांची नजर कमी होणे ई.अस्वस्थ वाटणे
इ.श्वासाची गती वाढणे-श्वास घेण्यास त्रास होणे
उ.छातीचे ठोके वाढणे,भीती वाटणे,ह्रद्याची स्पंदने स्वत:लाच जाणवणे.
४.आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाब कसा घडतो ?
वरील सर्व कारणे रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरतात.परंतु यात प्रत्येक कारण वेगवेगळ्या पध्दतीने शरीरात रक्तदाब वाढवते.यातील
अ) अजीर्ण,एकावर एक अन्न सेवन करणे,विरुध्द आहार घेणे, शरीराला जे योग्य नाही अश्या अन्नपदार्थांचे सेवन करणे- वरील सर्व कारणांनी शरीरात अपचनाच्या घटनांनी शरीरात रस आदी धातु योग्य तऱ्हेने निर्माण होण्याऎवजी शरीरात चिकटपणा(आम) ,मेद,क्लेद अतिरिक्त प्रमाणात तयार होतो यामुळे रक्तवाहीन्यांमध्ये विकृत म्हणजेच खराब कफाची वाढ होवून तो खराब भाग साचून राहतात याने रक्तवाहीन्यांचा आतील व्यास कमी होवून रक्त वाहून नेण्याची क्षमता दुप्पट प्रमाणाने वाढते पण ती विकृत स्वरूपातील असल्याने त्याचा परिणाम म्हणून रक्तदाब वाढण्यास साहाय्य होते.
ब) रुक्ष आहार- सतत कोरडे अन्न खाल्ल्याने तसेच वरीलप्रमाणे आहार घेतल्यास आतड्यांची पचनक्षमता,अन्न ग्रहण करण्याची क्षमता,मल भाग-पोषक भाग याचे विवेचन करण्याची क्षमता,व ते बाहेर टाकणे या सर्व प्रक्रिया मंदावतात व यामुळे आतड्यांना मलभाग बाहेर टाकण्यासाठी जोर करावा लागतो याने सर्व शरीरात वाताची तीव्रतेने वाढ होते याने आतडे कोरडे पडून दिवसेंदिवस वाताची तीव्रतेने वाढ होवून गॅस होणे,कोरडे ढेकर येणे असे साधी लक्षणे ते रक्तदाबाच्या तीव्र लक्षणासारखे परिणाम स्वरूपात याचा परिणाम उलट दिशेने ह्रद्यावर होतो.
क)वेगावरोध- शौच ,लघवी यांची संवेदना झाल्यावर बऱ्याच वेळेला कामाच्या धांदात वेग अडवले जातात तसेच शिंक,व्यवायाच्या वेळी शुक वेग,उलटी,ढेकर याचे वेग अडवले जातात याच्या परिणाम वात दोषाचे वर्धन होवून त्याने रक्ताचा दाब वाढतो.
ड)अम्लपित्त- विविध प्रकारचा पित्त वाढणारा आहार विहार वारंवार घेतल्याने तीव्र अम्लपित्ताचा त्रास सुरु होतो याने वारंवार उलट्या सतत जुलाब असे लक्षण तयार होतात याने शरीरातील रस धातु कमकुवत होतो.तसेच रक्त धातु पित्त धातु एकमेकाशिवाय राहू शकत नाही याने रक्त धातुतील पिताची तीक्ष्णता व द्रवता तीव्रतेने वाढून रक्तदाब वाढतो.
इ) विष परिणाम- विष परिणाम हा कोणत्याही स्वरूपात होवू शकतो.किटक दंश असेल किंवा विरुध्द आहार असेल विष हे विष असते याचा परिणाम तात्काळ ह्रद्यावर होतो.या अनुषंगाने विरुध्द आहार,किटक दंश,गोवर,कांजण्या व इतर शरीरात विषार तयार करणारे आजार अथवा तत्सम घटक हे ह्रद्यावर विषाचा तीव्र परिणाम घडवतात. व रक्तदाब वाढवण्यास मदत करतात.
ई) मानसिक ताण तणाव,चिंता,शोक,भय,द्वेष,अहंकार,लोभ,विषयासक्ती- मानसिक दबाव हा रक्तदाब वाढवणारा सर्वात मह्त्वाचा घटक मानला जातो.या वरील सर्वच कारणांची मनाची एकाग्राता दिवसेंदिवस कमी होवून चंचलता वाढण्यास मदत होते,राजसिक प्रकृती वाढ धरते त्याचा परिणाम स्वरूप काहीही पर्याय डोळयासमोर न दिसल्याने अस्वस्थता वाढून रक्तदाब वाढतो.
उ)आधुनिक औषधांच्या विपरीत परिणाम झाल्यामुळे रक्तदाब वाढणे
ऊ) अत्यधिक रात्री जागरण,अत्यधिक दिवसा झोपणे,अति मैथुन – या सर्व कारणामुळे शरीरातील वात पित्त या दोषाचे प्रमाण अत्यधिक वाढते याने रक्तांमध्ये उष्णता अत्यधिक प्रमाणात वाढून रक्ताचा दाब वाढतोअतिव्यवायाने म्हणजेच अति प्रमाणात मैथुनाने शुक्राचा म्हणजेच शरीरातील वीर्या चा तीव्रतेने क्षय होवून त्याच परिणाम ह्रद्य कमकुवत होण्यावर होतो व रक्तदाब वाढून ह्रद्रोगाचा आजार वाढतो.
ए) जंतांचा प्रभाव,अत्यधिक प्रमाणात पाणी पिणे,चुकिच्या सवयी-व्यसने- या दोन्ही कारणांचा परिणाम रक्तदाब वाढतो.अत्यधिक पाणी पिण्याने पचन बिघडते आजकाल तहान नसताना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.परंतु वेळेच,दिवसाचे,शरीराचे गणित हे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असते त्यामुळे उगाचच कारण नसताना भरपूर पाणी प्या हा सर्वथा चुकिचा सल्ला आहे.बाकी पचन बिघडल्याने गणित कसे चुकते हे वरती नमुद केलेच आहे
५.आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाबाचा प्रतिकार-
आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाबाचा प्रतिकार आयुर्वेदात ४ टप्प्यात केला जातो
अ) जीवनशैली सुधारणा व पथ्यपालन,रुग्णाची योग्य समजूत,व्यायाम,योगा
ब) औषधोपचार
क) पंचकर्म
ड) रसायन
अ) जीवनशैली सुधारणा व पथ्यपालन,रुग्णाची योग्य समजूत,व्यायाम,योगा या आजारा अंतर्गत जे जे रुग्ण आहेत त्याना तात्पुरते पथ्य सांगितले जातात पण ते तात्पुरते पथ्य उपयोगाचे आहेत का तर नाही फक्त १०० रुग्ण एकामागे एक तपासून गोळ्या लिहुन मसालेदार पदार्थ ,भात इत्यादी खावू नका याने रुग्ण बरे योग्य रीतीने बरे होत नसतात.रुग्णाला व्यवस्थित समजावून त्याच्या जीवन शैलीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे त्याअंतर्गत सर्व खाणे पिणे व्यायाम याचे महत्व समजावता आले पाहिजे व समजावयला हवे.
ब)औषधोपचार औषधोपचार हे शारीरिक व मानसिक या दोन्ही स्तरावर केले जातात,यात कारणानुसार ब्राह्मी,जटामांसी,प्रवाळ,रसपाचक,मेदोपाचक,आदी औषधांचा कारणानुरुप उपचार व्हायला हवे.
क) पंचकर्म यात बस्ती,ह्रद्बस्ती,विरेचन रक्तमोक्षण,नस्य,शिरोधारा इत्यादी पंचकर्म रक्तदाब कमी करण्याकरीता वापरले जातात.यात वात पित्त कफ रक्त या दोषानुरुप पंचकर्म वापर केला जातो.
ड) रसायन रसायन हे आजार पुन्हा होवू नये याकरीता केला जातो.उच्च रक्त दाब योग्य रीतीने नियंत्रणात राहावा याकरीता औषधोपचार पंचकर्म उपचार झाल्यानंतर ब्राह्मरसायन यासारखे रसायन सेवन करावे.
यारीतीने प्रत्येक आजाराचे एका विशिष्ठ मर्यादेपर्यत निर्मुलन करता येते. सदर लेख हा आयुर्वेद अभ्यासानुसार लिखित व मांडलेले मत हे व्यक्तिगत आहे.यात आक्षेप असल्यास चर्चेकरीता आपण खालील मोबाईल नंबर किंवा ई मेल वर संपर्क करावा